Tuesday, July 13, 2021

पुनःश्च हरिओम

काल tv वर लागलेला #पुनःश्च हरिओम मला ठरवूनही पाहता आला नाही
घरी पोहचलो तो संपायला आला होता
पण महत्वाचं एक वाक्य कानी पडलं,,,,

संकट आल्यावरच आपल्याला आपली खरी ओळख होते  #पुनःश्च हरिओम हे त्यावरच उत्तर आहे मित्रांनो विशेषतः माझ्या #मराठी
मित्रांनो,,,,,

आज जो काही कोरोना काळ आलाय त्याला कोण किती कसा जबाबदार ते सोडून,,,
#तुम्ही किती #सक्षम आणि आव्हानाला सामोरे जाऊ शकता ते ठरवण्याची वेळ आली आहे

राज्यकर्ते आणि ते ही देवधीदेवां सारखे लाभल्यावर आपण काय बोलणार ,,, ते जातिवंत मंदीत संधी शोधणारे
मेल्या टाळूवरच लोणी खाणारी जमात ती
असो,,,,

पण हीच संधी आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करायची आलेल्या संकटाला घाबरून घरात बसणार आहोत की भय्ये बिहारी जसे कठोर मेहनत करून ते ही 2000 मैलावरून इथे येऊन तिथल गावाकडच घर दार मुलबाळ सांभाळतात सरकारचे नियम पळून प्रसंगी पायदळी तुडवून ते धंदा करतात
मग आपण का नाही करू शकत???

भले नोकरी सुटली असेल पण तुम्ही तुमच्या बिल्डिंग खाली चौकात नाक्यावर परिसरात
ज्या ज्या गरजेच्या अगदी दूध पासून चहा कोफी नाष्टा चा धंदा करू शकता ते ही अल्प भांडवलात जास्त नफा मिळवता येईल असा
काम मग ते कुठलंही असो करायला लाजू नका आणि धंद्यावर उभं राहिल्यावर माजू नका
मग बघा असले अजून 10 कोरोना येऊ द्यात झाट काही फरक पडत नाही
मेहनत करणाऱ्याला मरण नाही
लाजून मारण्यापेक्षा काही करून मरा
मला खात्री आहे तुम्ही मरणार तर नाहीच पण तुमच्या जीवावर चार लोकांना नक्कीच जगवाल
तेव्हा #पुनःश्च हरिओम
लागा कामाला

Sunday, July 29, 2018

आज बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढ दिवस .....

||श्री शिवरयाय नमः||
बाबासाहेबांचा जन्म २९ जुलै १९२२ चा ................
थोर  इतिहासकार आणि एका महान तपस्वी
त्यांचे पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे..........

 मित्रांनो ,
   आज एक " पण "  करा ............
बिग्रेडीन्च्या शोधास तोडीस तोड आणि वरचढ असा शोध लावा .............
मग त्यासाठी कसलाही विचार करू नका ................
शिवरायांचे हिंदवी साम्राज्य स्थापन करायचे असेल तर "गांधी " नीती वापरू नका ................
फारच रटाळ आणि मुळू मुळू आहे तो  गांधी वाद .........
तो वापरला म्हणून १९४७ उगवले नाहीतर टिळकांच्या नीतीने १९२२ ला पण मिळाले असते स्वातंत्र्य ..........
न जाणो बाबासाहेबांच्या ( पुरंदरे) जन्मदिवशीही मिळाले असते
त्यासाठी टिळक, आगरकर, सावरकर , नेताजी बोस यांच्या विचारांचे पालन करा ............

Friday, July 27, 2018

२६ जूलै १९९९ कारगिल विजय दिवस

२६ जूलै १९९९:-

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी दि. २६ जुलै रोजी *‘कारगिल विजय दिन’* साजरा केला जातो.

कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजय पताका फडकविणा-या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता, ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले, त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना, आपणदेखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे, ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे.

"दि. २६ जुलै कारगिल विजय दिन"
या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जिवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रूपात आले, त्यानंतर त्यांनी अनेक भारतीय शिखरांवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमीवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. दि. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी ‘कारगिल विजय दिन’ साजरा केला जातो.

   जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी ‘कारगिल युद्ध’ एक ताजे उदाहरण आहे. सुरुवातील पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत, परंतु नंतर स्पष्ट झाले की, पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. १३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून, तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत, ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो.

Thursday, July 26, 2018

🚩.......!!बाण स्तंभ!!.......🚩










इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.

ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.

हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –

‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.

ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!

संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.

पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.

‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.

मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.

भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात. 
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.

दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय.....

-प्रशांत पोळ

Friday, May 4, 2018

*मृत्युंजय अमावस्या*

||श्री शिरायाय नमः||
देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें।
निकल गयीं पर झुका नहीं।।
दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का।
दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के।
ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?।
सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया।
धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह।
गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब।
शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा।
पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा।
आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया।
तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर।
जीवन पुष्प चढाया था।।
है दुजा दुनिया में कोई।
जैसा शंभू राजा था?।।

*शाहिर योगेश*

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी दंडवत*

*हनुमान जयंती - छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी*

||श्री शिरायाय नमः||

दोन चिरंजीव. एकांची जयंती. एकांची पुण्यतिथी. एक जन्मतःच चिरंजीव. तर एकानी मृत्योत्तर चिरंजीवपदाचे अढळपद ध्रुवासारखे झळकत ठेवलेले. छत्रपति शिवाजी महाराज अवघ्या हिंदुहृदयावर निरंतर तेवत आहेत. अक्षूण्णपणे.

दोघांनिही सज्जनांचे रक्षण केले. राक्षसांचे निर्दालन केले. स्वधर्माची प्रतिष्ठापना केली. दोघांच्या वावरामध्ये मरूताचे सामर्थ्य होते. दोघांनीही भीम पराक्रम गाजवून आपली चरित्रे फुलवलेली.

हनुमंतांनी माता अंजनीच्या गर्भातून जन्म घेताच पाहिले ते सूर्य बिंब आणि त्याच्या दिशेने मार्गाक्रमण केले. शिवरायांनी देखील जन्म झाल्यानंतर आपली ध्येयनिश्चिती गाठण्यासाठी पराक्रमाचे उत्थान केले. दोघांचीही दिशा एकच होती. दोघांचेही स्वप्न एकच होते. त्यांना भगव्या रंगास कवटाळायचे होते. हनुमंतांना भगव्या सुर्यबिंबाला तर महाराजांना परमपवित्र भगव्या ध्वजाला.

दोघेही शोक हारीच आहेत. सौख्यकारीच आहेत. दोघेही पुण्यवंतच आहेत. पुण्यशिल आहेत. पावन आहेत. परितोशक आहेत. दोघांनीही आपल्या बाहुबळाने ध्वजांगे आवेशाने उचललेली आहेत. दोघेही जेव्हा पराक्रम गाजवीत होते तेव्हा काळाग्नी आणि कालरूद्र हे भयाने चळाचळा कापलेले आहेत. समरांगणात पराक्रम गाजविताना दोघांच्या दंतपंक्ती या आवेशाने आवळलेल्या गेलेल्या आहेत, नेत्रातून तेजाच्या अग्नीज्वाळा चाललेल्या आहेत, भृकुटी बळाने ताठरलेल्या आहेत. दोघांचेही चपळांग विद्युल्लतेसारखेच आहे. दोघांनिही चरित्रामध्ये संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत, व त्यांच्या उड्डाणाची दिशा देखील 'उत्तर' आहे. मग महाभारत कालीन इंद्रप्रस्थ असो किंवा शिवकालीन दिल्ली-आग्रा असो.

दोघांनी आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदलेले आहे. आणि अवघ्या हिंदुजातीला पराक्रमाचा अन् दहशतवादाला संपविण्याचा दिव्य मार्ग दाखवून दिलेला आहे.

Saturday, April 13, 2013

शिव-सह्याद्री आणि ट्रेकिंग

ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल न होता अविस्मरणीय अनुभवातून अनेकविध
गोष्टींची माहिती देणारा छंद व्हावा, गीरीदुर्गांमागे दडलेला आपला वैभवशाली इतिहास जाणावा.
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे.
नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे.
स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं.
तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं.
असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला.
पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या,
तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत.
कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही.
कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल.
हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना.
त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!!!"
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.
अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे.
पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि.
त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत.
त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे.
त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही.
कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे.
अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न.
रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो.
आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य.
तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली.
त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये,
म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर
जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या.
त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला.
मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले.
सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो !
रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा !
सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे.
त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की,
तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात !
मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की,
त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात.
आणि मग जो आवास घुमतो, तो ऐकावा.
सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.
पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो.
चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला,
त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित,
घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात.
हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते.
त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते.
तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो.
त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात.
त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो.
कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार
त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात.
मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात,
"आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !"
रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.
दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे,
उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे,
भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी,
दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा,
भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा !
असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे.
त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे.
वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !
सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि.
सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत.
कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत.
दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ.
एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.
प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच.
सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते.
ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात.
सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात.
या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत.
एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना.
पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत.
एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी !
काय ही नावे ठेवण्याची रीत ?
चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?
कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत.
कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे.
मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ
आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान.
इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची.
सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे.मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते.
नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे.
हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते !
भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते.
अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की,
शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो.
खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल.
महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते.मावळे एकूण चोवीस आहेत.
पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.
मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.
राजा शिवछत्रपति :- बाबासाहेब पुरंदरे



Thursday, April 11, 2013

"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव"

"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव"
आज गुढीपाडव्याच्या दिवशी मित्रांनो मी एका संकल्प करत आहे
,,,
परवा नेमही प्रमाणे वढू-तुळापूरला जायच्या तयारीत होतो
आम्ही एकंदर दहाजण होतो त्यानिमित्त तिथे गेल्यावर
आपल्या मित्रांसमोर काही बोलाव या उद्देशाने कागद वही हातात घेतली
मनात आहे ते कागदावर उतरवू पाठ करू आणि बोलू
अस ठरवलं आणि ,,,
मी लिहायला लागलो हि पेन त्या कागदावर झरझर चालत होता
मी लीहीत होतो,
अंदाजे आठ दहा पान पण लिहून झाली आणि लक्षात आल
मला जे बोलयचे आहे त्याच्या विपरीत लिहल आहे
पण जे लिहल होत तो एक संकल्पच ठरावा अशीच
शंभू महादेवाची ईच्छा  होती ?,आई आई भवानीची ईच्छा होती ?,
शिवरायांची ईच्छा होती ? काहि माहित नाही पण
लिहिता लिहिता मी अचानक एक
संकल्प करून बसलो होतो ,,,
गेल्या २\४ वर्षात श्र.भिडे गुरुजींच्या संपर्कात आलो तस तस 
श्री.संभाजी राजां बद्दल कुतूहल वाढत गेल
शाळा कॉलेजात असताना ऐकलेला-शिकवला गेलेला वाचलेला
शंभू महादेव नक्कीच त्याच्या विपरीत होता
आणि हळू हळू जास्तच कुतूहल वाढत गेल
आणि यावेळी तर मी संभाजी बलिदान मासा निमित्त
माझ्या घरातच शंभू राजांच पुस्तक त्यातली रोज १०\१५
वाचून दाखवू लागलो आणि त्याचा अर्थ हि सांगू लागलो
तस तसे श्री शंभू महादेव डोक्यात फिट्ट बसू लागले
आणि त्याचाच परिणाम म्हणू आता मला
माझ्या शब्दात
"धर्मवीर छत्रपती श्री शंभू महादेव "
एक चारित्र्यवान ,नीतीमान ,दिलदार ,कवी,दोस्तांवर जीवापाड प्रेम करणारा आणि छत्रपतींच चौदा चौक्ड्यांच राज्य टिकवण्यासाठी
स्वतःच्या प्राणाची आहुती देणारा राजा
मांडायचा मोह होवून बसला आहे मला माहित नाही
हे शंभू महादेवाच शिव धनुष्य मी कस उचलणार आहे
पण संकल्प तर करून बसलो आहे कि
या पुढे श्री.शंभू महादेवाच चरित्र लोकां पर्यंत पोहचवायचं
त्यांच्या वरील केले गेलेले आरोप खोडायचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे
मी माझ्या समजणाऱ्या सध्या सरळ भाषेत
त्यांच्या चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे पुसण्याचा प्रयत्न करणार आहे
मित्रानो मला आपल्या सहकार्याची , आई भवानीच्या आशीर्वादाची गरज आहे
हे मला करायचं आहे कारण ,,
आज ज्या गुढी पाडव्याचा शुभेच्छा आपण आनंदातिरेकाने देत आहोत
त्या सणाची शान हि राखली गेली
ते फक्त आणि फक्त केवळ शंभू महादेवां मुळेच,,,
मंदिरांचे कळस आणि अंगणातली तुळस शाबूत राहिली
ती शंभू महादेवां मुळे,,,
सुवासिनींच कुंकू आणि हातातील  बांगड्या शाबूत राहिल्या
त्या शंभू महादेवां मुळेच ,,,
गायी गुर, संत सज्जन ,लेकी-सुना सारे निर्भयतेने जगले
ते शंभू महादेवां मुळे
गळ्यातल जानवे आणि डोक्यावरची शेंडी शाबुत राहिली
ती शंभू महादेवां मुळे,,,

म्हणूनच त्यांच्या वरील झालेल्या-केलेल्या आणि जाणून-बुजून
केलेल्या अन्यायाच परिमार्जन करणे हे मी माझ कर्तव्य समजतो
हे जर मी केल नाही तर माझ्या पुढील पिढ्या माफ करणार नाहीत.

सुनील भूमकर ,,

Sunday, April 7, 2013

एक आगळा संत! श्री रामदास स्वामी

एक आगळा संत!
महाराष्ट्राच्या उज्ज्वल संतांच्या प्रभावळीत
संत रामदासांचे वेगळेपणे फार ठसठशीतपणे समोर
येते. वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकीय
या तीन अर्थानीच रामदास हे इतरांपेक्षा वेगळे
होते असे नव्हे, तर ते ज्या काळात जन्मले
आणि जी शिकवण त्यांनी दिली हे पाहिले तर
त्यांच्यातील मोठेपण समजून घेण्यास मदत
होईल. अल्लाउद्दीन खिलजीचे आपल्या प्रदेशात
येणे, विजयनगर साम्राज्याची वाताहत
आणि एकंदरच या प्रदेशावर झालेले परकीय
आक्रमण यामुळे ज्याला आज महाराष्ट्र म्हणून
ओळखले जाते तो प्रदेश मनाने मेलेल्या अवस्थेत
जवळपास चारशे वर्षे राहिलेला होता.
तेराव्या शतकाच्या सुरुवातीस यवनांचे आक्रमण
महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला आपल्याकडील
राजवटींनी सुरुवातीच्या काळात त्यांना तोंड दिले.
परंतु नंतर नंतर त्यांचा धीर सुटला.
विजयनगरच्या साम्राज्यातला रामदेवराय
मारला गेला आणि हा संपूर्ण टापू
परकियांच्या अमलाखाली आला.
एका दुर्दैवी योगायोगाचा भाग म्हणजे एकीकडे
आपला प्रांत असा परकियांच्या अमलाखाली येत
होता आणि त्याच वेळी संत ज्ञानेश्ववर
समाधी घेत होते. अल्लाउद्दीन
खिलजी ज्या वर्षी आपल्या प्रांतात आला त्याच
काळात संत ज्ञानेश्ववरांनी संजीवन
समाधी घेतली. त्यानंतर जवळपास चारशे वर्षे
हा प्रदेश मनाने मेलेलाच राहिला. अनन्वित
अत्याचार झाले. परंतु भागवत धर्माचा प्रभाव
इतका की त्यालाही तोंड देऊन माणसं जिवंत
राहिली, धर्म जिवंत राहिला; परंतु
काही करायची ऊर्मी मात्र हा समाज घालवून
बसला.
अशा या मनाने मेलेल्या समाजाला उभे राहावे असे
वाटले ते १६३० नंतर. म्हणजे
शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर. त्यानंतर
या प्रदेशात धुगधुगी निर्माण झाली आणि मुर्दाड
समाजाला पहिल्यांदा ‘स्व’ची जाणीव झाली.
राजकीय पातळीवर हे होत असताना सामाजिक
पातळीवर
या आणि अशा ओल्या समाजाला आकार देण्याचे
काम संतांनी केले. त्यात रामदासांचा वाटा जास्त
महत्त्वाचा. कारण त्यांनी भक्तांना मेल्यानंतर
स्वर्गात जाता यावे यासाठी पुण्य
जमा करण्याचे शिकवण्याची संतांची पारंपरिक
भूमिका सोडून इहलोकातील अस्तित्वास महत्त्व
द्यायला शिकविले. तोवर हा देह नश्वर आहे.
तो कधी तरी जाणारच.
त्याची कशाला इतकी काळजी करायची. वगैरे
प्रकारच्या शिकवणींनी मराठी मनावर शेवाळ
निर्माण झाले होते. ते रामदासांनी घालवले.
शरीरास महत्त्व आहे. तेच टिकले नाही तर पुण्य
काय करणार. असा थेट सवाल
केला आणि धडधाकट राहण्याचे महत्त्व निर्माण
केले. सर्वसाधारण जनतेस निराकार भक्ती जमत
नाही. डोके
ठेवण्यासाठी त्यांना कोणाची तरी मूर्ती हवी असते,
एखादा ज्याला देव म्हणता येईल असा आकार
हवा असतो. मारुतीच्या निमित्ताने
समर्थानी तो आकार मोठय़ा प्रमाणावर समाजात
पसरवला. त्यामुळे पूजा करायची तर
भीमरूपी महारुद्राची करायची आणि अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होण्याच्या त्याच्या क्षमतेची आराधना करायची हे
रामदासांनी तरुण, बेकाम पोरांना शिकवले.
कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर
आपला अभ्यास पक्का हवा,
हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात..
अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे,
प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ
असा की एखाद्या विषयावर
बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर
आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही.
रामदासांपर्यंतच्या संतांच्या शिकविण्यात
तत्कालीन परिस्थितीमुळे असेल, पण एक
प्रकारचा निरिच्छवाद दिसतो. त्या वेळी परकीय
आक्रमक मोठय़ा प्रमाणावर अत्याचार करीत
होते. घरेदारे, पोरेबाळे लुटत होते. त्यामुळे संसार
हा एक प्रकारे असार
बनला होता आणि प्रपंचाचा एक प्रकारे
कंटाळा आला होता.
तो संतांच्या वाङ्मयातही दिसतो.
हा कंटाळा रामदासांनी घालवला. प्रपंच करण्यात
काहीही कमीपणा नाही,
तो करतानासुद्धा ईश्वरभक्ती करता येते.
किंबहुना तो चांगला झाला तरच ईश्वर
भेटतो इतक्या ठसठशीतपणे
रामदासांनी आपली शिकवण दिली. प्रपंच
करावा नेटका. असे अन्य
कोणी संतांनी सांगितल्याचे दिसणार नाही.
‘संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न
सांडता, जनामध्ये सार्थकता, विचारेची होय. दृढ
निश्चय करावा, संसार सुखाचा करावा, विश्व
जन उद्धारावा, संसर्गमात्रे’
अशी रामदासांची शिकवण. प्रपंच
नेटका करायला हवा. मग
तो नेटका करण्यासाठी काय काय अडचणी येऊ
शकतात, याची सहज शिकवण रामदास देतात.
म्हणजे तरुणपणी एखादा प्रेयसीच्या प्रेमात
कसा जगाला विसरतो, आईवडिलांकडे
कसा दुर्लक्ष करतो आणि नवसाने
झालेला हा पोरगा बायकोच्या प्रेमापोटी आपल्याशी असा वागू
लागल्यावर वृद्ध आईवडिलांना शंखतीर्थ कसे
घ्यावे लागते. हे सांगणे असो, वा ब्राह्मणे
बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर, जे
पाहताची चतुर समाधान पावती.
असा विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला असो,
रामदास रोजच्या जगण्यातील उपयुक्ततेत भर
घालतात. साहेब कामासी नाही गेला, साहेब कोण
म्हणेल त्याला. असा प्रश्न उपस्थित
करणारा व्यवस्थापन कौशल्य
जाणणारा दुसरा संत शोधूनही सापडणार नाही.
येके ठाई बैसोन राहिला, तरी मग
व्यापची बुडाला. इतक्या नि:संदिग्धपणे रामदास
सल्ला देतात तो आजच्या काळातही लागू पडतो.
हा संत इतका प्रयत्नवादी आहे की देवदेव करीत
बसा असे तो अजिबात सांगत नाही. देव
पहाया कारणे, देवळे लागती पहाणे. असे ते
सांगतात आणि पुढे लगेच म्हणतात. देवळे म्हणजे
नाना शरीरे, तेथे जीवेश्वर राहिजे, नाना शरीरे,
नाना प्रकारे भगवंत भेटे असेही लिहून टाकतात.
म्हणजे देव पाहायचा असेल, त्याला भेटायचे
असेल तर माणसांचीच सेवा करायला हवी,
अशी त्यांची मसलत आहे. राखावी बहुतांची अंतरे,
भाग्य येते तदनंतरे. असे रामदास म्हणतात
तेव्हा त्यात आधुनिक मानव व्यवस्थापन
शास्त्रच असते. नरदेहाचे उचित, काही करावे
आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त,
सर्वोत्तमी लावावे. असे ते म्हणतात
तेव्हा जन्माला येऊन काही ना काही चांगले
करण्याची गरजच अधोरेखित करीत असतात.
रामदासांनी दीर्घकालीन नियोजनास फार महत्त्व
दिले आहे. मेळवती तितके भक्षिती, ते कठीण
काळी मरोन जाती, दीर्घसूचनेने वर्ततीत,
तेचि भले. अशा शब्दात ते भविष्यासाठी नियोजन
कसे महत्त्वाचे आहे ते सांगतात. या नियोजनात
मानवी मनव्यवस्थापन फार महत्त्वाचे असते. ते
लक्षात घेऊन रामदास सांगतात. पेरले ते उगवते,
बोलिल्यासारखे उत्तर येते, मग कटु बोलणे,
या निमित्ये. असे ते विचारतात. म्हणजे गोड
बोलून काम होत असेल तर उगाच
कडवटपणा कशाला तयार करायचा, हे ते
विचारतात, हे आधुनिक व्यवस्थापनशास्त्रच
झाले. ज्याला काही मिळवायचे आहे,
समाजासाठी काही करायचे आहे, त्याला अनेक
अडचणींना तोंड द्यावे लागते. ते
सोडवताना अनेकांची मदत घ्यावी लागते.
तशी ती जरूर घ्यावी, ज्यांना आपण तोंड देऊ
शकत नाही,
त्यांचा सामना करण्यासाठी तितक्याच
तोलामोलाचा कोणी आपल्या वतीने उभा करावा,
हे सांगताना त्यांच्यातील व्यवहारकुशलताच
दिसते. ठकासी व्हावे ठक, खटासी व्हावे खट,
लौंदासी आणून भिडवावा दुसरा लौंद. असे ते
सहज सांगून जातात. हे सगळे करताना महत्त्वाचे
काय, तर मनाचा निश्चय आणि त्या अनुषंगाने
ध्येयप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न. ते जर चोख
असतील तर नशिबावर अवलंबून राहावे लागत
नाही, असे रामदासांचे म्हणणे आहे. जेणे
जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. हे ते
सांगून जातात. म्हणजे तुम्हाला आज जे
काही मिळाले आहे ते तुम्ही काल जे काही केले
त्याचे फळ आहे. काल उत्तम असेल तर आज
आणि उद्या उत्तमच असेल,
असा त्यांचा प्रयत्नवादी सल्ला आहे. असे
करताना अभ्यास लागतो. तो डोळसपणे करावा.
कोणापुढे तोंड उघडायाची वेळ आली तर
आपला अभ्यास पक्का हवा,
हा त्यांचा सल्ला आहे. त्यासाठी ते सांगतात..
अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे,
प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे. याचा साधा अर्थ
असा की एखाद्या विषयावर
बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर
आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही. असे
असले तरी ज्याला समाजकारण करायचे आहे,
त्याला इतरांचे सहन करायची सवय असायलाच
हवी. जो बहुतांचे सोसिना, त्यास बहुत लोक
मिळेना. अशा सोप्या शब्दांत रामदास
इतरांना मदत करण्याचे महत्त्व पटवून देतात.
हे झाले समाजकारणाच्या बाबतीत. परंतु
रोजच्या संसारातसुद्धा अनेकदा आपल्यावर
मूर्खपणा केल्याची टीका होते.
ती टाळायची असेल तर
रामदासांची मूर्खाची लक्षणे वाचायलाच हवीत.
जगात मूर्खाची लक्षणे सांगणारा दुसरा संत
मिळणार नाही. चारचौघे बैसले जन, तयामधे
करी शयन. त्यालासुद्धा मूर्ख ठरवले आहे
रामदासांनी. म्हणजे सगळे बसून गप्पा मारतायत.
त्यात एखादा गाढवासारखा लोळतोय. हे
आपणही बघत असतो. सांगे वडिलांची कीर्ति.
तो येक मूर्ख. म्हणजे उगाच बापाच्या नावाने
मिशीला तूप लावीत फिरतो आणि स्वत: मात्र
काही करीत नाही, तोही रामदासांच्या मते मूर्ख.
असोनिया व्यथ, पथ्य न करी सर्वथा. म्हणजे
एखादा आजार आहे आणि तरीही कुपथ्य
करतोय.. तोही मूर्खच. आपणास जेथे मान, तेथे
अखंड करी गमन. तोही रामदासांच्या मते मूर्ख.
परस्त्रीसी प्रेमा धरी, श्वशुरगृही वास करी.
याचीही गणना त्यांनी मूर्खातच केलेली आहे.
घरी विवेक उमजे, आणि सभेमधे लाजे, शब्द
बोलता निर्बुजे, तो येक मूर्ख. अशी उदाहरणे
आपण अनेक बघतो. घरी बडबड करतात. पण
चारचौघांत बोलायची वेळ आली की लाजतात,
हा एक मूर्खपणाच. तस्कारासी ओळखी सांगे,
देखिली वस्तु तेचि मागे. यालाही ते मूर्खच
म्हणतात आणि त्यात अयोग्य ते काय? दोघे
बोलत असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे.
याला मूर्ख नाही म्हणावे तर काय? कळह
पाहता उभा राहे, तोडविना कौतुक पाहे, खरे
असता खोटे साहे. तो एक मूर्ख. याचा प्रत्यय
आपल्याला आजही पदोपदी दिसेल.
दोघांची भांडणे कौतुकाने पाहणारे असंख्य
असतात. या भांडणात मध्यस्थी न
करता असा तमाशा बघत
बसलेल्यांची गणना त्यानी मूर्खात केली आहे.
अशाच पद्धतीने रामदास अनेक गोष्टी सहजपणे
शिकवतात. या सगळय़ात महत्त्व आहे ते
विवेकाला. या गुणाची आज सार्वत्रिक
कमतरता भासत असताना रामदासांची शिकवण
त्यामुळेच कालबाहय़ वाटत नाही. चांगले जगणे
शिकविणारा हा संत म्हणूनच
आजही ताजातवाना वाटतो. त्याच्याकडे
त्या नजरेने पाहायला हवे, इतकेच.
लोकप्रभातून साभार..

माहुली .. सुळक्यांचा गड

||श्री शिव शंभू नमः ||
माहुलीला सुळक्यांचा गड असेच
म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार
झालेला एक दुर्गही म्हणता येईल.
माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल
आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव
माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक
करणारी वाट
आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून
येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश
करता येतो.
माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड
असे उपदुर्ग आहेत.नवरा-
नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे
अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून
शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार
चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांन
ी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात
महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात
तो मुघलांना द्यावा लागला.
सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक
आहेत.दुर्गाची वाताहत
किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे
महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन
पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग
जिंकला.राजांच्या या विजयाने
अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले
नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे,
"पावसाळ्यात जवळचे काही दिसत
नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख
पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच
आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
गडावर अजूनही रान आणि उंच गावात
आहे.रात्री मुक्काम केला,तर
जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात
अनेक वेगवेगळ्या प्रकारचे
प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्
रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक
कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके
हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे
आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन
महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची
करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक
लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून
झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष
देत उभा आहे.
Photo: माहुली .. सुळक्यांचा गड
माहुलीला सुळक्यांचा गड असेच
म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार
झालेला एक दुर्गही म्हणता येईल.
माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल
आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव
माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक
करणारी वाट
आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून
येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश
करता येतो.
माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड
असे उपदुर्ग आहेत.नवरा-
नवरी भटोबा शंकर,ब्रह्मा,वजीर,चंदेरी, असे
अनेक सुळके म्हणजेच लिंग्या आहेत.या दुर्गावरून
शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार
चालवला.१६५७ मध्ये शिवाजीमहाराजांन
ी कोकणातले बरेच दुर्ग जिंकून घेतले.त्यात
महुलीही जिंकला.पुरंदरच्या तहात
तो मुघलांना द्यावा लागला.
सध्या गडावर जुने अवशेष शिल्लक
आहेत.दुर्गाची वाताहत
किती आणि कशी होते,त्याचे इतर दुर्गांसारखे
महुलीही एक उदाहरण आहे.इ.सन.१६७० मध्ये ऐन
पावसाळ्यात या दुर्गावर हल्ला चढवून तो दुर्ग
जिंकला.राजांच्या या विजयाने
अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले
नाही.इंग्रजांनी त्याची नोंदही केली आहे.
एका मुघलाने महुलीविषयी लिहिले आहे,
"पावसाळ्यात जवळचे काही दिसत
नाही.अंधारया रात्री तर हाताला हाताची ओळख
पटत नाही ... ही तळकोकणची राजधानीच
आहे.किल्ला अतिशय मजबूत आहे..."
गडावर अजूनही रान आणि उंच गावात
आहे.रात्री मुक्काम केला,तर
जंगली प्राणी दिसतात.पूर्वी तळातील जंगलात
अनेक वेगवेगळ्या प्रकारचे
प्राणी असल्याची नोंद आहे.भव्यता,रौद्
रता.जंगल,अफाट पाऊस अशा नैसर्गिक अनेक
कारणांनी माहुली अवघड झाला आहे.त्याचे सुळके
हे त्या दुर्गाचे वैशिष्ट्य आहे
आणि त्या सुळक्यांच्या अवघड चढणीचे आवाहन
महाराष्ट्रातील युवकांनी पेललेले आहे.
अगदी यशस्वीपणे.वजीर,विष्णू,नवर्याची
करवली,भटोबा,असे अतिअवघड सुळके इथले युवक
लीलया चढून गेले आहेत.तीन दुर्गांचा मिळून
झालेला माहुली त्याच्या बळकटीपणाची साक्ष
देत उभा आहे.

Wednesday, April 3, 2013

रामशेज किल्ला


६ वर्ष अजिंक्य राहिलेला नाशिक जवळचा रामशेज किल्ला
नाशिक जवळ पिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे,आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.
शहाबुद्दीन खान
ह्याच किल्ल्यावर चांदसितारा फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्लेजिंकून घ्यावेत असाऔरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीनकिल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक दिवसात किल्ला घेतो म्हणून.
किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी,हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणालामाहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्यातोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पारगांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (यालालाकडी दमदामा असेहीम्हणतात) तोही इतकाउंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.
२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला. [wpsr_facebook] [wpsr_plusone]
फतेह खान
मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरीकिल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगडगोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनहीकिल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.
फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते दृश्य पाहून फतेह खान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेलीतटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानांजादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची. [wpsr_facebook] [wpsr_plusone]
अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कियुद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयारहोता. मग त्याने आपल्या सरदारा कडूनमांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टेक्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नागदे दिजीये बाकी मी संभाल लेता हु” मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.
मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायलानिघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.
फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खानमात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडकमोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता.किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाबहो जोगे तो तुम्हारा नाम होगा”वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेहखान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.
एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालूहोता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळेफतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्यालक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानानेरात्रीचा मारा सुरुकेला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलेतेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणित्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरूनमोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.
वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वरयेणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळेमावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यूतांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंचडोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू)पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”
कासम खान
औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावूनघेतले. आणि कासम खानला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजीमहाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पणकासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते. हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातातजाईल असे वाटत होते.पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरलीहोती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासमखानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.
तो दिवस सरला, रात्रझाली. रात्रहि सरली.दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्यालक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीवआला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळाकिल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्लाकरायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.
कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.

Friday, August 3, 2012

शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड मोहीम 2012

"पन्हाळगड़ ते पावनखिंड-विशाळगड़ 
ऐतिहासिक पदभ्रमण मोहिम २०१२"
रविवार दिनांक १ जुलै ते बुधवार दिनांक ४ जुलै २०१२ 


शिवशौर्य सोबत पन्हाळा विशालगड मोहीम राबवली गेली त्या मोहिमेत 
मी केलेल्या भाषणाचा भाग अवश्य vवाचा 
धर्मशास्त्र सांगत ३ गोष्टी नित्य नूतन
१-रामायण महाभारताची कथा
२-सूर्योदय सूर्यास्त
३-आणि स्वपत्नी,,,
पण मला या आणखी ४ थ जोडवास वाटतय
शिवचरित्राची गायन ,,,,,

आज ईथे मी बोलायला बसलो आहे याचा अर्थ मी काही ईतिहास तद्न्य नाही ,
संशोधक तर नाहीच नाही ,
पण या वाटेवरची ती गरज होती कारण हि शिवशौर्याची परंपरा आपल्याला कळली पाहिजे .

त्या शिवाय हे जे काही स्वातंत्र्य आज उपोभोगतो आहे ते कशाच्या जोरावर मिळवलं ते कळणार नाही,,,,
असो या वाटेवरचा ईतिहास सांगण्याआधी
एक छोटी गोष्ट सांगावीशी वाटते,,

या पृथ्वीची चराचराची रचना केल्यावर सार्यांना आपापली कामे सोपवल्यावर
ब्रम्हदेव निवांत झाले,

ईकडे या पंच महाभूताचे चक्र सुरु झाले.
संध्याकाळ होत आली तसा सूर्य हि हळूहळू शांत होवू लागला आणि अचानक
तो चिंताग्रस्त झाला अरे आता थोड्याच वेळात माझा अस्त होणार मग या
सार्या चराचराला प्रकाश कोण पुरवणार ?
सारे चंद्र चांदण्या तारे तारका विचारात पडले कि आता काय करायचे?
या सार्यांना आपली कुवत ठावूक होती आपण सारे मिळूनसुद्धा
सूर्याच्या प्रकाशाचा मुकाबला करू शकत नाही,मग,,,?
कुणाचाच डोक चालेना काय करायचं?
ईतक्यात एक लहान पणती धावत आली आणि म्हणाली,
प्रकाश दादा मला माहित आहे मी तुझ्या उजेडाचा मुकाबला नाही करू शकत
पण,,,
मी माझ्या परीने तुझ प्रकाश पोहचवायचं काम मी नक्की करेन
तू निश्चिंत मनाने जा,

नेमकी गोष्ट ईथेच आहे माझ्या मित्रांनो,
त्या पणती सारखा आपण प्रत्येकाने आपापल्या पुरत्या
जर पणत्या लावल्या तर क्षणार्धात आपण दिवाळी साजरी करू शकू आणि,,,,
आणि सगळ्यांनी मिळून पेटवायचच ठरवलं तर क्षणार्धात
समोरच्याची राखरांगोळी करू मग समोर भले पाकिस्तान असो नाही तर चीन,,,
आणि मी तुमच्या समोर आलोय त्या पणतीच काम करायला
कारण जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जण
असो ,,
नमनालाच घडाभर तेल जास्त ओतल तर पुढे अजून आग लावायची आहे
कदाचित पुरणार नाही,,,
--------------------------------------
तर सांगायचं अस ,
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आई आणि गुरु दादोजींनी असा काही तयार केल
होत आणि स्वतः छत्रपतींनी त्यांच्या मावळ्यांना ,,,
त्या सार्यांच्या मनात त्यांनी ठासून भरवल होत,
हिंदवी स्वराज्य आणायचं असेल तर ,
या महाराष्ट्र भवानीला आता पाण्याचे -दह्यादुधाचे अभिषेक खूप झाले ,
तिला प्रसन्न करावयाचे असेल ,
हिंदुस्थानला यवनांच्या दास्यातून सोडवायचे असेल तर आता,
ईथल्या देवदेवतांना रक्ताचा अभिषेक घालावा लागेल ,,

आणि यासाठी आपल्या मावळ्यांना घेवून महाराज प्रथम रोहीडेश्वरावर गेले,
आणि आपल्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या त्या रोहिडेश्वराला घातला पण
त्या रोहिडेश्वराला हि त्यांनी बजावला बाबारे हा माझा आणि माझ्या मावळ्यांच्या रक्ताचा
पहिला आणि शेवटचा अभिषेक बर का,
आता आम्हाला ईतकी ताकद दे कि यापुढे तुला शत्रूच्या रक्ताचा अभिषेक घालू शकू ,,
आणि आई भवानीने तीच वचन पाळल,
महाराजांना ३२ दातांच्या बोकडाचा नैवेद्य द्यायचं बळ तिने पुरवल,,,
महाराजांनी अफझल खानचा वध केला,
खानाचा कोथळा बाहेर काढला,,,

हो,पण ती महाराष्ट्र भवानी होती.
ती अशी एका बोकडाने प्रसन्न होणारी नव्हती ,
तिला आता चटक लागली होती यवनांच्या रक्ताची ,,
आणि महाराज निघाले अफझल खानच्या फौजेचा सुद्धा दारून पराभव झाला होता,
आता स्वस्थ बसन शक्य नव्हत,

ईकडे महाराजांनी आदिलशहाचा कोल्हापुर पर्यंतचा मुलुख घेतला होता.
महाराजांची हि गरुड झेप त्याच्या डोळ्यात सलत होती,
आणि आता तर राजे कोल्हापूर नंतर विजापुरी धडक मारणार होते,
आणि ईथेच आदिलशाहने पुन्हा एकदा औरंगजेबाला आवाज दिला "ईस्लाम खतरेमे"

अर्थात औरंग्याला हि भारी पडलेल्या अफ्झुल्याला मारणारा शिवाजी त्यालाही नकोच होता ,
मोंगलाई आणि आदिलशाही यांच्या मध्ये एक हिंदू राष्ट्र उदयाला येतय हे त्याला हि पाहवत नव्हत,
महाराजांचा राज्य विस्तार हा कुणा जहागीर्दाराचे बंड अथवा उठाव नव्हता,हे तो जाणून होता,
आणि त्याच वेळी आदिलशहाच्या दरबारात
ईस्लामचा पक्का बंदा शागीर्द सिद्दी ,सिद्दी जोहर हजर झाला ,,,

जोहर म्हणजे रत्न बर का हा त्याचा बहुमान होता ,
सार्या मुसलमानात शोभून दिसावा असा,असा तो खुनशी हबशी
बारा हत्तींची ताकद लाभलेला आपल मनगट म्हणजे त्याचा एक एक ओठ होता
म्हणजे तो किती धिप्पाड आणि ताकदवान होता विचार करा,
हत्ती सुद्धा त्याला धडक मारताना विचार करत असे,,
असा हा सिद्दी आदिलशहाला  म्हणतो ,
"मला त्या हरामखोर पाजी शिवाजीला पकडायची परवानगी द्यावी ,,"
आणि योग्य माणूस आणि संधी याची वाट पाहत असलेला आदिलशहा मनोमन खुश झाला ,
त्याने लगोलग सिद्दी जोराहारला "सलाबतखान"खिताब देवून गौरवल आणि,
सोबत ३०\३५ हजार फौज हि दिली,आणि सोबतीला पित्याच्या वधाचा
बदला घेण्यासाठी वाट पाहणारा फाजलखान हि सोबत दिला त्याच्या नसा नसात
महाराजांच्या विरुध्द द्वेष भरला होता,,,
--------------------------
सिद्दी निघाला,
त्यावेळी महाराजांच्या सैन्याने मिरजेच्या किल्ल्याला वेढा दिला होता.
आणि औरंगजेब त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसला होता ,
महाराज कोल्हापुरात गुंतल्याचे पाहून त्याने आपल्या मामाला शाहीस्त्येखानला
आदिलशहाच्या मदती साठी ,ईस्लामाच्या गौरवासाठी ,ईस्लामचा झेंडा फडकवण्यासाठी,पाठवले
तिकडून सिद्दी आणि मागून शास्ताखान या दुहेरी पेचात त्याने बरोबर पकडल,,
पण ईथे नेमका योगायोग लक्षात घ्या ,
अशीच परिस्थिती शहाजी राजांची झाली होती,
पापी औरंग्याचा बाप शहाजहान आणि आदिलशहा एक झाले होते,
दोघांनी मिळून शहाजी राजांचा पाडाव करून त्यांना कायमचे दक्षिणेत धाडले,,
आणि हि किमया साध्य झाली केवळ एका हाळीवर वर "ईस्लाम खतरेमे"
आणि ईथेच महाराजंचे द्रष्टेपण लक्षात येते ,
"आपण ईतिहासात डोकावतो ते एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी,
आणि महाराज डोकावत ते झालेल्या चुका सुधारण्यासाठी "
आता महाराजंवर मोठी जबादारी होती ,
या दोघांना पुहा एक होवू द्यायचे नव्हते,
ईथे आणखी एक सांगावास वाटत हि महाराजांची युद्धनीती होती ते स्वतःच्या
भूमीत युध्द खेळ नसत ,,,
नेमक हे आज चीन पाकिस्तान करताना दिसत आहे
आणि त्या दृष्टीने त्यांना पन्हाळा हा दक्षिण सीमेवरचा किल्ला
मुक्कामाला अत्यंत चांगला होता,
शिवाय विस्ताराने खूप मोठ्ठा रस्तेही भरपूर,आणि आपल्या मुलखाची हानी नाही,
आणि शास्ताखान पुण्याच्या पलीकडे लगेच येणार नव्हता
बर मागे फिरालोच तर पुन्हा शास्ताखान आणि सिद्दीजोहर एक होण्याची शक्यता ,
हा सारासार विचार करून महाराजांनी पन्हाळा निवडला,,
शिवाय पन्हाळ्यावर अन्नधान्य भरपूर किमान ३\४ महिने पुरेल ईतके,,
बर पुन्हा २\३ महिन्यात पाऊस हि सुरु होणार होता
मग सिद्दीचा वेढा हि सैल होणार होता,
आणि तिकडे मिरजेत नेताजी पालकर तयार होतेच महाराजांच्या मदतीला,,
हि सुद्धा जमेची बाजू होतीच,,,
हो पण हा वेढा सिद्दी जोहरचा होता, त्याने तो असा काही आवळला होता कि
परिंदा भी पर न मार सके,मुंगीहि शिरताना दहादा विचार करेल,परंतु
"सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहिजे"
भगवंत म्हणजे सत्य सत्याचे अधिष्टान आणि ईथे तर साक्षात महाराज म्हणजे
शिवशंकराचा अवतार हेच सत्य होते ,,
यश हे मिळणारच होत नियतीशी तसा करारच  झाला होता,,,
--------------
पण शत्रू हि तितकाच बेरकी आणि मात्तबर होता ,
या सार्या परिस्थितीची जाणीव त्याला हि होती,
या साठी टोपीकरांच्या लांब पल्याच्या तोफा हि त्याने मागवल्या होत्या
आणि शत्रूचा शत्रू तो आपल्या मित्र या न्यायला जागून हरामखोर ईंग्रज
ईमाने ईतबारे जोहारला सामील झाले होते,
येताच गडावर तोफांचा मारा चालु केला,त्यांना माहित होत हे सार पावसाळ्याच्या आत
उरकल पाहिजे,त्यासाठी महाराजांना मदत करणार्या आजूबाजूच्या लोकांना
धमक्या देवून ताब्यात घेण्यात आल,खबरदार जर महाराजांना मदत कराल अशी तंबी
देण्यात आली,दिवस जात होते तस तसा सिद्दीचा वेढा
सैल होण्या पेक्षा जास्त आवळला जात होता,
आता मात्र महाराज चिंतेत पडले त्यांनी ठरवलं आता जास्त दिवस
पन्हाळ्यावर राहता काम नये,,
काही तरी युक्ती लढवून पन्हाळ्याहून सुटका करवून घेतली पाहिजे,,,
तिकडे शास्ताखान पुण्याला हळूहळू नख लावू पाहत होताच
नेताजींची ताकद बाहेरून मदतीला कमी पडत होती,
आणि सिद्दीशी समोरासमोर लढायची ताकद आपल्यात नाही याची हि जाणीव होती,,
त्यातही स्वराज्याची चिंता अधिक,,
अजून किती दिवस अडकवून घेणार निसटायला तर हवेच हवे,
आणि विचार ठरला पन्हाळ्यावरून निसटायचा ,
आणि महाराजांनी पहिला घाव घातला ,
सिद्दीला भूलभुलैया पत्र पाठवलं ,
जोहर साहेब मला तुमची खूप भीती वाटते ,खरतर तुम्ही ईथे आलात तेव्हाच मला तुम्हाला भेटायचं होत.
पण तुमच्या पुढे आपली काय किंमत म्हणून टाळल,
पण आता आम्ही जातीनिशी तुम्हास भेटावयास तयार आहोत
तेव्हा आमच्या हातून चुकून झालेले गुन्हे आपण माफ करावे
भेटी अंती सविस्तर बोलूच वैगेरे वैगेरे,,,"
अशी गोड गोड मध चाटवलेली पत्र मग रोजच जावू लागली
हळू हळू महाराजांचे दूत आता जोहर कडे ये जा करू लागले.
आणि सिद्दीला घाबरून
महाराज कसे शेपूट घालून बसले आहेत याचं चमचमीत बातम्या पसरवू लागले.
आणि दुसरी कडे आदिलशहाला महाराज आणि सिद्दी एक होत आहेत
रोज दारूच्या मटणाच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत अशा बातम्या जावू लागल्या ,
लवकरच दोघ हि हातमिळवणी करणार आहेत,आणि आदिलशाही ताब्यात घेणार आहेत,
जोहारला त्यासाठी महाराजांनी लाच दिली आहे,
असे सारे डावपेच आखत खेळत महाराजांनी जोहर भेटीचा एक दिवस ठरवला ,,
-------------------------
१३ जुलै हिंदूंचा राजा शिवाजी आता शरण येणार असच एकंदर वातावरण सिद्दीच्या गोटात होत,
ईकडे जोहारही उद्या शिवाजी ताब्यात येणार म्हणत मनाचे मांडे खात होता ,
आणि या सार्याचा अपेक्षित परिणाम जाणवू लागला होता,,
वेढा हळूहळू सैल झाल्याचा जाणवत होत ,,
परंतु पन्हाळ्याहून निसटायचे म्हणजे नक्की कुठे जायचे?
आणि मग विशाळगडी जायचे असे ठरले,,
विशाळगडीच का? तर
आसपास घनदाट जंगल डोंगराळभाग,आणि यावर सिद्दीची मात्रा चालणार नाही,
आणि आपण छोट्या छोट्या वाटांनी  आपण सहज कोकणात उतरू शकतो,
पन्हाळ्यावर तयारी सुरु झाली सर्वात पुढे होते बाजीप्रभू
सिद्दीच्या तोडीचे तेव्हडेच उंच आणि तगडे,
उभे राहिले तर शनिवारवाड्याचा बुरुज उभा आहे कि काय असे जाणवे,
पण सिद्दीच्या भेटीला जायचे म्हणजे नक्की काय करायचे ?
आणि मग निस्टायचे  कसे?
आणि भेटलो तर सिद्दी त्याच्या तावडीतून सोडेल?
अनेक प्रश्न भुंगा घालू लागले,,
मग ठरले तोतया शिवाजी पाठवायचा आणि महाराजांनी दुसऱ्या वाटेने चकमा देवून निसटायचे,
पण शिवाजी कुणाला बनवायचे हा प्रश्न होताच सारेच चिंतेत पडले,,(संदर्भ पणतीच्या गोष्टीचा)
आणि या सार्या मावळ्यांच्या मध्ये शिवा न्हावी बसला होता,
शिवाजी कोण बोलल्या बरोबर त्याने तटकन उडी मारली
"महाराज मी होतो शिवाजी"
शिवा न्हावी महाराजांची दाढी करणार एक सामान्य माणूस,,
बघा महाराज तुमच्या सारखीच दाढी-केस देखील आहे,
आज संधी मिळाली आहे राज ध्या ती कापड मी जातो सिद्दीला सामोरा,
एकंदरच त्याचा तो आवेश पाहून राजे म्हणाले,
"तू जाशील रे शिवा पण विचार केलास का कि तुला
कुणाला सामोर जायचे आहे ?सिद्दीला,,,,,,
त्याच्या ताब्यात गेल्यावर काय होईल माहित आहे?
एक गुढ शांतता पसरली मुसलमान आणि तोही सिद्दी त्याचा ताब्यात गेल्यावर
काय होत ते सारे जाणून होते,
पण त्याच आवेशात शिवा म्हणाला ,
"माहित आहे मला तो मारणार हाल हाल करून मारेल,"
पण एक सांगू राज?
असाच आयुष्यभर जगलो तर लोक म्हणतील शिवान्हावी मेला
पण सिद्दीचा हातून मेलो तर लोक म्हणतील शिवाजी म्हणून मेला ",,
ईकडे महाराजांच्या कपड्याचा जोड तयारच होता,
महाराजांनी सांगितलं जा शिवा कपडे घालून ये
दोन मिनिटात शिवा हजर कपडे घालून,,,
काय पण मरणाची घाई ,,,?
महाराजांनी आपली कवड्याची माळ त्याच्या गळ्यात घातली,
आणि आता मात्र महाराजांना अश्रू आवरेनात,
ते शिवाला म्हणाले शिवा तू मरणार व्हयर माझ्या साठी?
शिवा लगेच सावध झाला ,
"महाराज आता मन बदलू नका माझ्यावर जबादारी टाकली आहात ना ?
मी मरेन पण तुमच्या नावाला बट्टा नाय लावू देणार महाराज आता मन नका बदलू  ,,
अहो मेल्या माणसासाठी रडणारे खूप पहिले पण जित्या माणसासाठी रडणारा
राजा आम्हाला भेटला राजे तुमच्या एकेका अश्रूतून एकेक शिवाजी महाराज तयार होईल
तुमी काळजी नका करू,,
आज संधी ती मला मिळतेय महाराज आता मन नका बदलू
आणा तो जिरेटोप ईकडे,,आणि ईतक्यात त्रिंबकपंत आल्याची वर्दी आली
तसे महारज लपले शिवला म्हणाले तू गप्प उभा रहा काही बोलू नकोस,,,
त्रिंबक पंत आले महाराजांना मुजरा केला ,मुजरा महाराज
शिवा काहीच बोलला नाही तसाच पाठमोरा मख्ख उभा
त्यांनी परत मुजरा केला मुजरा महाराज,,
शिवा तरीही गप्प पण गप्प कसा बसणार
आणि शिवाने तोंड उघडल मात्र त्रिंबक पण रागावले ,शिवा काही अक्कल ?
म्हणत हात उगारला लगेच महाराज बाहेर आले
थांबा त्रिंबक पंत अहो रोज माझ्या बाजूला उभे राहणारे तुम्ही फसलात
तो जोहर काय चीज आहे ठरलं
आपला शिवाजी म्हणून उद्या शिवा च जाईल,,,
पटापट पटापट शिवाला सूचना देण्यात आल्या कस वागायचं ?
कस चालायचं कस बसायचं,,,
कस बोलायचे ते त्रिंबक पंत बघतील,,
ठरलं निवडक १२०० मावळे घेवून निसटायचे
आणि थोडे शिवाच्या पालखी बरोबर पाठवायचे बाकीच्यांनी ईथे
राहून किल्ला लढवायचा
------------------------------
१२ जुलै रात्री १० चा सुमार,
रस्त्याची खडानखडा माहिती असणारे माहितगार मंडळी
आणि स्वतः बाजी प्रभू आणि शिवा काशीद
कानोकान खबर लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात होती,
सिद्दी मागे लागलाच तर या दाट जंगलात त्याला पाठलाग करता येवू नये,
किर्र रात्र फुटाफुटावरच काहीही दिसू नये याची हि काळजी ,
ते जंगल घेत होत,
ईकडे जोहरच्या छावणीतहि आनंद पसरला होता.
पाण्या पावसाच निमित्त होवून वेढा ढिला पडत होता,
पावसाच्या रिपरिपी पुढे मशाली टिकत नव्हत्या,

ईकडे शिवा तयारच होता हिंदवी स्वराज्यासाठी ,,
आज आपण म्हणतो आई जिजाई आणि गुरु दादोजी यांच्या मुळे
महाराज घडले हो घडलेच परंतु, लक्षात ठेवा
माता भवानी या मावळ्यांच्या रूपात सतत महाराजां सोबत होती
त्यांच्या वरून जीव ओवाळून टाकायला ,,

मित्रांनो आज हा रस्ता पार करायला २\३ दिवस लागत आहे,
सकाळी चालायला सुरवात केली तर वाटत कधी संध्याकाळ होणार कधी मुक्कामी पोहचणार?
कधी करपेवाडी येणार?कधी खोतवाडी येणार?
आणि खांद्यावर काय तर आपलीच ब्याग,,,
आणि ईथे तर महाराजांची पालखी न्यायाची होती,
समोरचा रस्ता माहित नाही,झाडी झुडप कापत तो तयार करायचा ,
पुढे चालायचं पाय टाकू ती जमीन असेल कि निसरडा रस्ता माहित नाही,
त्यातही रात्री सर्पटणारे प्राणी आणि सोबतीला मिट्ट अंधार,,,

गडावरून निसटण्या आधीच महाराजांनी आपल्या सरदारां मार्फत
रसद तयार ठेवाली होती,
जस जसे ते पुढे सरकणार होते तस तसे त्यांचे सैन्य वाढणार होते,
पाठलाग होणार हे तर निश्चित,
त्यासाठी शत्रूला मागेच भांडता ठेवण भाग होत,
बर हि सारी खबरदारी शत्रूला समजू न देण हे आलच,
नाही तर सारा डाव फिसकटणार हे ठरलेलं,बर पुढे विशाळगडला हि
वेढा होताच तो फोडायचा तर हाताशी सैन्य हे हवेच तसा तो वेढा कितीही सैल असला
तरीही पन्हाळ्यावरून धावत पळत येवून अशी कितीशी ताकद लढायची राहणार होती?
पण आई भवानी पाठीशी होती ,
____________________
महाराजांनी जंगलातील अवघड वाट निवडली होती.
महाराज निघाले वार्या पावसात मशाली टिकत नव्हत्या.
हळू हळू जोहरचे सैन्य मागे पडत होते.
पुढे मसाई पाठराजवळ निवडक सैन्य वाट पाहत होत.
तिथूनच पुढील हालचाली होणार होत्या.दोन पालख्या तयार ठेवल्या होत्या.
ईथूनच महाराज आणि शिवा वेगवेगळे होणार होते,

शिवा आता तुझ्यावरच पुढची सारी मदार
शिवा नीट जा जपून जा.
जमेल तितक जमेल तस सिद्दीच्या फौजेला झुलवत ठेव,
जा आई भवानी तुझ्या पाठीशी आहे,
शिवा पालखीत बसला भोयानी पालखी उचलली
कोण कुठला शिवाजी स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो काय,
आम्ही भुलतो काय,
यातून साध्य काय होणार,आमचा फायदा काय,
उलट राजा म्हणून शिवाजी मिरवणार आम्हाला काय असला विचार हि नव्हता ,
असो,
शिवा काशिद्ची पालखी निघाली
तिकडे महाराजही निघाले,

पाऊस,चिखल,निसरडा रस्ता यामुळे वेग येत नव्हता,वाटाडे वाटा शोधात रस्ता बनवत होते,
एक जरी मावळा मागे पडला तर काळ त्याला क्षमा करणार नव्हता ,,
पुढे पठार संपत आले, हळू हळू खोतवाडी,आंबेवाडी,कळकवाडी,रिंगे
वाडी,मालेवाडी,पाटेवाडी,
पार करत महारज म्हसवडला आले,,,
काय पटापट गाव मागे गेली ना?
खरच ईतक सार सोप्प होत?

हा सारा डोंगराळ दाट जंगलचा भाग ,डोंगरच्या डोंगर पार करायचे,
खिंडी पार करायच्या ,आणि पाऊस?? पाऊस म्हणजे महापूर,,,
शेवाळे दगड,गोटे,चीखलाच्या वाटा या सगळ्यांची
खडानखडा माहिती असल्या शिवाय दिवसा उजेडी जाण शक्य नव्हत
तिथे महाराज रात्री निघाले होते,,,

गावकुसातून जाताना गावातली कुत्री भुंकून भुंकून त्यांचा निरोप
सिद्दी पर्यंत कसा जाईल याची काळजी घेत होते,,
ईकडे सिद्दीचे सैनिक नाही म्हंटल तरी पहारा देतच होते,
थोडा सैलपणा आला होता ईतकच पण पहारा चालूच होता,
जवळपास नाही पण लांब लांब सैनिक रात्री फिरतच होते,
आणि घात झाला ,

रात्रीच्या अंधरात कुणाचे चेहरे दिसत नव्हते पण त्यांच्या
लक्षात आला काही तरी गडबड आहे कुणी तरी पालखीत बसून
वेढ्यातून निसटू पहाताय,,
आणि छावणीत एकच गोंधळ उडाला भागा भागा गनीम भागा
काफिर पकडो मारो सालेको
पकडो मारो काटो धाढ धाड सारे शस्त्र सज्ज झाले.
नगारे ढोल वाजू लागले
सारे हबशी जमा झाले हातात भाले बारच्या बंदुका घेतल्या
आणि लक्षात आल
अरे पालखीतून जात आहेत म्हणजे ते शिवाजी महाराज असतील,
मग मात्र आणखी गोंधळ उडाला सारेच पालखीवर तुटून पडले,
ईकडे सिद्दी उद्याची स्वप्न पाहत झोपायच्या तयारीत होता,
छावणीतील गोंधळाने त्याचीही हि झोप उडाली,
सार्यांनी पालखीला वेढा घातला ठरल्या प्रमाणे खोटा खोटा प्रतिकार झाला ,
पालखी ताब्यात घेतली आता पाहिलं तर शिवाजी ,,,,

शिवाजी गिरफ्तार झाला याचा उन्माद ईतका कि कुणाला
वाटलाच नाही हा शिवाजी असेल कि नाही याची खातरजमा हि करावीशी वाटली नाही,
सनई चौघडे वाजवण्यात आले,फटाके फोडण्यात आले,
साला शिवाजी पाळतो तो हि आमच्या वेढ्यातून,,,?
अशी एक प्रकारची नशा होती,
प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता,
जो तो येवून शिवाजीला बघून जात होता
सारे एकमेकांना गचलत होते काफिराचा राजा दिसतो तरी कसा हे पाहण्यासाठी
सिद्दीच्या छावणी बाहेर गर्दी झाली होती
शिवला तसाच बांधून सिद्दी समोर उभा करण्यात आला
आता सिद्दी आनंदाने बेहोश झाला होता
सिद्दी गरजला हरामखोर भागाने कि कोशिश करता है?
शिवाने तोडक मोडक उत्तर दिल,,
तसा सिद्दी परत गरजला बैठो नीचे बैठो,
आणि खरच शिवाजी पकडला का बघयला फाझलखान आला
त्याला बापच्या वधाचा बदला घ्यायचा होता,

मशालीच्या उजेडात त्याने शिवाजीला निरखून पाहिलं ,,,
आणि ओरडला अरे ये सिवा नही,,,
अफझल वधाच्या वेळी शिवाजी महाराजांना जवळून पहिल होत त्याने
त्यामुळे त्याने लगेच ओळखल कि हे ते शिवाजी महाराज नाहीत,,

आता मात्र छावणीत खर्या अर्थाने गोंधळ उडाला,
सिद्दीने कमरेची तलवार उपसून त्याने शिवाला टोचून विचारलं
हरामखोर कौन हो तुम?
आम्हाला फसवतो?
तुम्हे मरणे का डर नही?
डर ? कसला डर आणि तो हि मरायचा?
अरे पालखीत हि कापड घालून बसलो तेव्हाच मेलो तू काय आता मारणार ? 
शिवा म्हणाला ,
"आर मरणाची भीती कुणाला?
आमच्या महाराजांना निसटायला जितका वेळ मला देता आला
त्यामुळे धन्य झालो माझ्या आयुष्याच सोन झाल,
आता तू मारलास काय तर काय फरक पडतो,?
अरे हव कशाला ते फालतू पांचट आयुष्य ?

पण सिद्दीचा पारा चढला होता त्याला हि वटवट ऐकायला वेळ कुठे होता?
त्याने खाचकन त्याची तलवार पोटात घुसवून पाठीतून बाहेर काढली,,,
आता त्याला वेळ नव्हता त्याला महाराजांचा पाठलाग करायचा होता.

शिवाला तसाच टाकून तो बाहेर आला सैन्यला तयारीला लावलं
कोणी कुठे कस जायचं,किती जणांनी जायचं,याच्या सूचना देण्यात आल्या ,,
महाराजांना कुठे गाठू शकतो याचा अंदाज घेण्यात आला ,

ईकडे शिवा कळवळत होता ,
त्रिंबक पंतानी त्याला सावरून धरल,,
शिवा कळवळत होता सिद्दीचा वार होता तो,
पण त्याही अवस्थेत शिवा म्हणाला पंत जातों आता ,
आमची येळ झाली
पण तुम्ही महाराजांना
भेटलात तर माझा निरोप द्या म्हणाव शिवान दुष्मनाला पाठ नाय दावली
वार छातीवर घेतला शिवा पळताना नाय मेला,
मृत्यू समोर हे असा छातीचा कोट करून उभा होता
तुमाला सोबल असाच मेला शिवा शिवाजी म्हणून मेला
पंत सांगाल ना? अस म्हणत म्हणत धडधडणारी छाती शांत झाली,,,
_____________________-
सिद्दीच सैन्य वायुवेगाने महाराजांच्या मागे लागल
पांढरपाण्या जवळ अडवू हे त्यांना पक्क माहित होत त्या प्रमाणे
त्यांची दौड सुरु होती,,त्यांचा अंदाज पक्का होता
महाराजांच्या सैन्याला आता हळू हळू सिद्दी मसूदच्या घोडदळाचा आवज ऐकू येवू लागला,
आणि बाजींनी शिवप्रभूंना सांगितलं महाराज आता तुम्ही व्हा पुढ
गनीम जवळ येतोय त्याला मी रोखून धरतो तुम्ही पुढ जा,,
मी हि घोड खिंड लढवतो,,

बाजी प्रभू,,,
येताना आपण पहिलय त्यांचा पुतळा तिथे उभे राहून मारे आपण आपले फोटू
काढून घेतले त्यांच्या शेजारी उभे राहूनही आपल्याला आपल खुजेपण नाही
ओळखता आले तो जो पुतळा आहे तो त्यांच्या वरील प्रेमामुळे असा मोठा बनवला नाही
बाजी होतेच तसे धिप्पाड जणू काही शनवार वाड्याचा बुरुज,,
धा धा वीस वीस तास व्यायाम करून ते शरीर कमावल होत,,
दोन हातात दोन तलवारी घेवून ते लढायला उभे राहिले कि काळ हि थरारत असे,

अशा बाजींनी महाराजांना सांगितलं तुम्ही व्हा पुढ विशाळगडा कडे
मी बघतो
यावर राजे म्हणाले बाजी मी तुम्हाला सोडून गेलो तर लोक नाव ठेवतील,
बाजी म्हणले राजे आम्ही असताना तुम्हाला लढाव लागल तर लोक
आम्हाला नाव ठेवतील त्याच काय?
राजे आम्ही तुमचे दास आहोत तुम्ही आमचे ईश्वर परमेश्वर,
आणि दासाच काम आहे ईश्वर सेवा ती आज करायला मिळतेय महाराज
माझ्या सेवेत तुम्ही का वाटेकरी होताय?
या सार्या द्रष्ट्या लोकां मध्ये आणि आपल्यातला नेमका फरक बघा
आपण त्या सर्व साक्षी परमेश्वराला म्हणतो तू जगाचा मालक
पण काम माझ कर नव्हे नव्हे आपली ईच्छाच तशी असते ,
अस नाही चालत आपल्या घरातला नोकर गादीवर बसून आणि आपण
घरदार साफ सफाई करतो का?
मग ईथे येणारे आपण सारे जर महाराजांना देव मनात असू तर आता त्यांच्या
गड किल्ल्यांची काळजी घेणे,किमान गडावर आपल्या हातून कचरा होणार नाही याची काळजी घेणे.
हे आपल काम आहे असो,

राजे निघा आता खूप उशीर होतोय ,
मात्र एक करा विशालगडावर पोहचल्यावर पाच तोफांचे बार उडवा.
तो पर्यंत मी हि खिंड लढवत ठेवतो.
अहो तोपर्यंत मरणार सुद्धा नाही काय तो दांडगा आत्मविश्वास?
ते हि हाताशी अवघे ३०० मावळे असताना आणि लढायच कुणाबरोबर तर सिद्दीच्या
जावयाबरोबर आणि त्याच्या सेने बरोबर,,,
आणि याच्या कडे सैन्य किती तर २०\२५ हजार,,

महाराजांना पुढे धाडलं आता
बाजींची तयारी सुरु झाली कुणी कुठे उभा रहायचं ?
कुणी भला चालवायचा? कुणी तलवार ?कुणी बाण ?
कुणी नुसतेच दगड गोटे मारायचे ?
जखमींना कस उचलायच त्यांना उचलताना आपल्याला तोशीश
लागणार नाही याची काळजी कशी घ्यायची?
भराभर सूचना देण्यात आल्या,आणि स्वतः बाजी ,,,

दोन हातात दोन तलवारी ,कमरेला दांडपट्टा,पाठीवर ढाल ,
जणू काही साक्षात शिवशंकरच तांडवाला सज्ज झाला होता,
आता पुढचा रणकल्लोळ उठ्ण्याआधीच सांगतो ,,

बाजींनी हि खिंड बारा तास लढवली आहे,,,

या बारा तासात रात्री १० दहा ते पहाटे पाच हि वेळ नाही बरका हे लक्षात घ्या .
यातली धावपळ नाही जमेस धरली,
रात्री पन्हाळ्या वरून निघाले आणि विशाळ गडावर पोहचले ईतक सार सोप्प गणित नव्हत,.
पहाटे पहाटे लढाईला तों फुटलं,
हरहर महादेवची गर्जना आसमंतात घुमली मावळ्यांच्या अंगात साक्षात
शिवशंकर संचारला होता,
सिद्दी मसूद २०००० हजाराची फौज घेवून ३०० मावल्यांवर तुटून पडला

आधी पायदळ मग घोडदळ एके करत अंगावर येत होत
लक्षात घ्या हे हे सार म्हणजे ऑफिसला सकाळी आलो आधी चला हाणला चहा
थोड ईकडे तिकडे केल मग काय जेवण मग जमल तर डुलकी
आणि संध्याकाळी काय तर घरी
अस नव्हत आपल्या लोकांना आराम नव्हता
पण सिद्दीच्या लोकांना आराम होता दमले कि मागे जात आराम करत
मग परत लढायला तयार हे दमले परत दुसरे तयार,,,
दुपार पर्यंत हा रणकल्लोळ चालूच होता,
बाजी आणि त्यांचे मावळे काही थकायला दमायला तयार नव्हते
मागे हटायला तयार नव्हते,

मग मात्र मसूदने एका बंदूक वाल्याला बोलावलं ,
बाजींच अक्षरशः शिवतांडव चालू होत,
बंदुकधारी आला,त्याला एका मचाणावर बसवलं,
सिद्दी मसूदला विचारतो बोला कुणावर बार टाकायचा?
त्यावर सिद्दी मसूद जे बोलला ते बखरीत हि लिहल आहे,
सिद्दी म्हणतो,
तो माधोमद उंच धिप्पाड लालेलाल झालेला मनुष्य दिसातोय ना?
ज्याच्या अंगावर आता जखमेला हि जागा शिल्लक राहिली नाही,
त्याला,त्याला गोळी घाल,बर हा बंदुकधारी जवळ जवळ मैलभर लांब
लक्षात घ्या आणि तरीही त्या वीस हजाराच्या गराड्यात हि बाजी उठून दिसत होते,
त्यांना शोधून काढून टिपण त्याला सहज शक्य झाल
कारण त्या गराड्यात ते अभिमन्यू सारखे लढत होते ,

ती सर्व काही सर्व ठरवून केलेली केलेली लढाई नव्हती,
तू मार मी अडवतो मी मारतो तू पड असला गोंधळ नव्हता,
सार्या सार्या हिंदुद्वेषी च्या जाळ्यात अडकलेल्या नरसिंहाची ती लढाई होती,
कावळा जसा चोची मारून मारून हैराण करतो तसे सारे यवन बाजींवर तुटून पडत होते,
मारलेला घाव चुकवायची संधी ते बाजींना द्यायला तयार नव्हते,
असे बाजी प्रभू रक्ताने लालेलाल झालेले त्या बंदुकधार्याला दिसले,
आणि सिद्दी मसूद आणि तो बंदुकधारी यांनी डाव साधला
ठो ठो करत गोळी घुसली थेट बाजीच्या छातीचा तिने वेध घेतला,
आणि आपल्या सैन्यात एकच गोंधळ उडाला,,

बाजी पडले
आणि त्याही परिस्थितीत बाजी उठून उभे राहिले म्हणाले घाबरू नका
मी तोफांचा आवाज ऐकल्याशिवाय प्राण सोडणार नाही,
लढत राहा लढत राहा मी आहे,
पुन्हा एकदा करकचून छातीला शेला बांधला,
पुन्हा मराठा सैन्य भिडला भीषण कापाकापी झाली ,
सारेच एका ईर्षेने लढत होते ,
त्यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी,त्यांच्या राजासाठी,मायभगिनींच्या अब्रूसाठी,
भगव्या झेंड्यासाठी,,,
बाजी उठले हातात दांडपट्टा घेतला आणि परत शत्रूला कापून काढू लागले
दिवस आता मावळतीकडे  झुकू लागला

आणि ईकडे,,   
राजे गडावर पोहचले सुर्व्याचा वेढा फोडून काढला,
तातडीने आदेश दिले आधी तोफांचा आवाज काढा,
माझी मानस लढत आहे त्यांना कळल पाहिजे मी पोहोचलो ते,,,
बाजींना कळेल मी गडावर पोहोचलो ते,,

गोळी लागलेल्या अवस्थेत बाजी लढत होते हि हसण्यावारी न्यायाची
गोष्ट नाही या लोकांची ईच्छा शक्तीच प्रबळ होती कि,
बाजीला गोळी लागलीय त्याला आता नेल पाहीजे हेच
ते वर बसलेले देव विसरून गेले होते
बाजींच्या पराक्रमाने ते ईतके अचंभित झाले होते कि क्षणभर
त्यांना वाटल आपल्यातलाच कुणी देव त्या असुरांना मारायला खाली तर
उतरला नाही ना?
आणि या गडबडीत बाजीने नकळत मागितलेल्या वराला ते हो म्हणून बसले होते,
तो वर होता,
"तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला "
लढाई चालूच होती बाजी विचारात होते महाराज पोहचले का?
कुणी तरी म्हणाल होय गडावर येजा दिसतेय महाराज पोहचले वाटत
आणि अस म्हणत असतानाच तोफांचा आवाज झाला ,

आणि बाजी आनंदाने बेहोश झाले राजे गेले गडावर पोहचले
या पेक्षा मोठ्ठा आनंद नव्हता,
हातातला दांडपट्टा खाली टाकला,आणि खाली कोसळले,
आता त्यांचा काम झाल होत,बस बस आयुष्य कृतार्थ झाल,,,
देवा आता ने खुशाल चल मी तयार आहे,,,
आणि बाजींच्या याच बेसावध पणाचा फायदा घेत
सिद्दीने अत्यंत निर्घुणपणे आपल आख्ख घोडदळ त्यांच्या अंगावर घातलं
बाजींच्या देहाची चाळण उडाली  ,,

आता मावळ्यांनी लढाई थांबवली ५\५० मावळे जे उरले होते
ते बाजूच्या जंगलात पसार झाले ,
सिद्दीला रस्ता मोकळा करून दिला ,,
सिद्दी निघाला विशाळगडी पोहचला मात्र त्याचा लक्षात आल
पन्हाळ्याला ४ महिने आता विशाळगडला ४ महिने महाराजांकडे
२७० किल्ल्ये गुणिले ४ महिने हे हे काही खर नाही याचा काही वेगळा
विचार केला पाहिजे अस विचार करत तो मागल्या
पावली पुन्हा आपल्या सासर्याकडे निघला ,,,

ईकडे महाराजांनी तोफा वाजल्या बरोबर त्यांनी निवडक मावळ्यांना
पालखी देवून बाजींना आणायला सांगितलं,
मावळ्यांनी बाजींच्या देहाचे तुकडे गोळा केले
पालखीत ठेवले आणि विशाळगडी पोहचले

महाराज आतुर झाले होते कधी एकदा बाजींना भेटतोय अस झाल होत,,
पालखी आली महाराज धावतच निघाले
तस मावळ्यांनी त्यांना अडवलं,
महाराज थांबा बाजी पालखीत नाहीत,मग?
कोण आहे आत?
महारज कडाडले,,
महाराज पालखीत बाजींच्या देहाचे तुकडे आहेत महाराज,,
हे ऐकताच महाराजांनी बाजी म्हणत आकांत केला ,,

तुम्हाला बघवणार नाही अशा अवस्थेत आहेत महाराज,
बाजी गेले आपले बाजी गेले,,
न राहवून महाराज पालखीत डोकावले
बाजींनी त्याही अवस्थेत हातात दांडपट्टा घट्ट धरलेला होता,
मस्तकावर घावचघाव झालेले दिसत होते,
बाजी तुम्ही सारे असे मला एकामागोमाग एक सोडून जावू लागले तर
हे राज्य मी कुणासाठी मिळवायचं बाजी बोला बाजी,,,
महाराज अत्यंत भावूक झाले होते ,
पण बाजी काळजी नका करू,

ज्यासाठी तुम्ही जगलात आपले प्राण पणाला लावलेत ते तुमच काम
आम्ही पूर्ण करू,,
बाजी तुमच्या रक्ताने जी घोडखिंड पावन झाली उद्यापासून
पावन खिंड म्हणून ओळखली जाईल,

गमत बघा जी शपथ महाराजांनी घेतली बाजी आम्ही तुमच अधुर काम पूर्ण करू,
त्यांचा प्रतिशोध घेवू ते महाराजांनी केल ही,,
परंतु हे भाग्य १८५७ ते १९४७ च्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या
क्रांतिकारकांच्या नशिबी नाही आल,
कुटुंबच्या कुटुंब खालसा झाली,अनेक जान जवान मुलीबाळी परागंदा झाल्या ,
कित्येक लोक फाशी गेले ,,आयुष्यातून उठाव लागल,

अशा अनेक ज्ञात अज्ञात वीरांच्या बलिदान नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळाल,
पण आता हरामखोरांनी बोलयला सुरवात केली रक्ताचा थेंबही न सांडता
क्रांती झाली आम्ही स्वातंत्र्य मिळवलं,,,
यापेक्षा हरामखोरी वेगळी ती काय असते?
या सार्यांच्या जखमांवर मीठ चोळल गेले,,,
रक्ताशिवाय स्वातंत्र्य ?म्हणजे ज्यांनी रक्त सांडले ते मुर्ख म्हणायचे का?
मायभूमी साठी रक्त सांडलं ते वायाच गेल,,,

अरे जा जगाचा ईतिहास तपासा
भिकामागून कुणालाही राज्य मिळाल नाही मिळवता आल नाही
भीक मागून केवळ भीकच मिळते राज्य नाही
याउलट या सार्यांना हिंसावादी ठरवण्यात आल
आम्ही भिका मागितल्या म्हणून राज्य मिळाल,,
या सार्या क्रांतिकारकांचा ईतका अपमान दुसर्या कुणी केला नसेल,,
शिरवाडकर या सार्या क्रांतीकारकांची व्यथा त्यांच्या कवितेत मांडतात
ते म्हणतात
शेवटी कळवळून त्या क्रांतीकारकांना आईलाच(मायभूमीला ) विचारावस वाटल आई चुकल का ग आमच?
फार सुंदर कविता आहे  ते क्रांतीकारक म्हणतात,,,
"ध्वज नाचविता तुझा
  गुंतले शृंखलेत हात
  तुझ्या यशाचे पवाड गाता
  गळ्यात येतात(फाशी जाव लागल)
  तव चरणांचे
  पूजन केल म्हणून गुन्हेगार
  देता जीवन अर्ध्य तुला
  ठरलो वेडे पीर,
  देशील ना पण
  तुझ्या कुशीचा या वेड्यांना आधार?
  आई वेड्यांना आधार ?
  गर्जा जयजयकार क्रांतीचा
  गर्जा जयजयकार,,,,
हे क्रांतिकारक या मायभूमीला विचारता आई हे सारे आम्हाला
वेडे ठरवत आहे तू तरी आम्हाला वेडे ठरवणार नाही ना?
हे शहाणे लोक आम्हाला वेडे ठरवत आहेत ,,
लोकांना सत्याच्या नावाखाली खोट शिकवत आहेत ,
"देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल,,,,?"
आई तूच सांग बिना खडग् आझादी ? काय याच्या बापाची पेंढ होती का?
का ईंग्रज सरकार यांच्या आईचा नवरा होता?
सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना नसती तर आता पर्यंत ५० वेळा
उपोषण करून झाल होत काय टाकल होत
तुमच्या पदरात?

असो खर बोललो तर नको त्या लोकांची नाव घ्यावी लागतात,
या साठी
यासाठी जर या सार्या विरातम्यांना शांती लाभावी असे वाटत असेल,,
मग ते महाराज असोत वा बाजी ,भगत सिंग असो वा सावरकर,
सुखदेव राजगुरू अथवा सुभाषबाबू ,,
ज्यांनी ज्यांनी या माय भूमीसाठी रक्त सांडलं त्या सार्यांसाठी
सरकार काय करेल ते माहित नाही पण ,,
या शंभू महादेवाच्या शिवतांडव भूमीवर जमलेल्या तुम्ही आम्ही
सगळे या महादेवाचे भक्त आपण आपल्या परीने वचन देवू.,,

राजे तुमच्या चरित्राचे श्रवण कवन करून गायन करून करून आम्ही किमान ईतकी
शक्ती कमवू कि तुमच्या ईतका पराक्रम शक्य नाही पण
किमान तुमच्या नावाला बट्टा लागेल अस कृत्य आम्ही आमच्या हातून घडू देणार नाही,
एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो,,
एकदा एका जंगलाला आग लागली सारे पशुपक्षी साधू संत
तिथे राहणारे आजूबाजूचे लोक ते जंगल सोडून जावू लागले.
ईतक्यात एका साधूने एका पक्षाला पाहिलं तो त्या झाडाला आग
लागली होती तरी तो त्यावर बसूनच होता,,,
त्यावर साधू त्याला म्हणतो अरे पक्षा देवाने तुला पंख दिलेत
जा उड त्याचा वापर कर झाड जळतंय तुला समजत का नाही?
त्यावर तो पक्षी बोलतो,,,
"साधू महाराज मला कळतंय तुम्ही माझ्या काळजी पोटीच मला बोलताय
सार्या जंगलाला आग लागली आहे कबुल या झाडाला मला वाचवता येणार नाही हे हि खर,,
पण मी असा कसा कृतघ्न होवू?
अहो या झाडावरच बसून मी सुमधुर फळ खाल्ली आहेत ,
याच्या सावलीत थंडगार हवेत मी झोके घेतले आहे,
याच्या पाणाची उशी करून मी त्याच्या कुशीत झोपलो आहे,
आणि आता तो जळत असतान मी कसा पळून जावू?
"फल खाये ईस पेड के गंदे किये है पात
 अब यही मेरा फर्ज है जल जाये ईसके साथ"
आता त्याच्या बरोबरच जळून जाण हीच माझी ईती कर्तव्यात आहे,,
पंचतंत्रातील एका पक्षाला हे कळल देशातल्या सार्या
पक्षांना हि अक्कल आली तर काय मजा येईल ?
अर्थात त्याच बरोबर हेही लक्षात घ्या जळून जाण हि दरवेळी ईतीकर्तव्यता
असेलच असे नाही ,मग,,,?
रोगच होवू नये म्हणून आज पासून ईलाजाला सुरवात करा
जमेल तस सैनिकी शिक्षण घ्या ,रोज १ तास व्यायाम करा
किमान वेळात वेळ काढून किमान १० सूर्य नमस्कार घातल्या शिवाय अन्नाला हात लावणार नाही
अस ठरवा
कारण लक्षात घ्या आज मुसलमान मुस्लीम लीग म्हणेल त्याला सरकारला हो म्हणव लागतंय
कारण त्यांनी उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना याच महत्व ओळखाल आहे
त्यांना त्यांच्या धर्माप्रतीची कर्तव्य माहित आहेत त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत,
आणि आम्ही आमच्या धर्माची टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानतो,,
जय हिंद जय महाराष्ट्र,,, 



Panhalgad to Vishalgad Trek 2012
Jul 1, 2012
by Shivashourya Trekkers
Shivashourya Trekkers organised 3rd Successful Panhalgad to Vishalgad Expedition with 80 'Mavale"
 https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=103673941569844814606&target=ALBUM&id=5762463841297645361&authkey=Gv1sRgCLP4n_Cwq7yXEg&feat=email