Sunday, August 1, 2010

पन्हाळा - विशाळगड एक ईतिहास जिवंत करणारी पालखी,,,


शिव शौर्याची परंपरा संस्कृती जतन करणारी पालखी,,,
पालखी,,, शिव तेजाची,,,
पालखी,,,बाजींच्या शौर्याला वंदन करणारी,,,
पालखी,,स्वमिनिष्टांची,,,  
माझा मित्र अमित मेंगळे याने कल्पना मांडली
कि, यावेळी पावन खिंडीच्या रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होताहेत.
आपण काही तरी वेगळ करू मला अस वाटत ,,,
आपण आता पर्यंत ,पन्हाळा विशाळगड ट्रेक सकाळी केला यावेळी,,,
आपण तो रात्रीचा करू आणि तोही ज्यावेळी महाराज
पन्हाळ्याहून निघाले रात्रो १० वाजता,निघू  

सोबत, महाराजांची पालखी ,
काळा मिट्ट अंधार , वेडीवाकडी वळणे ,निसरड्या पायवाटा ,
चिंचोळा मार्ग,सरपटणारे प्राणी, असंख्य जळवा,
किर्र जंगल , आणि ज्यावर रस्ता शोधूनही सापडणार नाही अस ,,,
मसई देवीच च पठार ,
कासार वाडी,करपेवाडी, आंबेवाडी,
असंख्य ओढे ,नदी नाले,धबधबे,आणि कासारी,,,,,?
आणि आपली हे शिव धनुष्य पेलायची हि पहिलच वेळ,,,
जमेल कारे आपल्याला?
आणि क्षणाचीहि  उसंत न घेता ,,
माझ्यातल्या मित्राने त्याला सांगितलं का नाही ?,,,,
 "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ...........
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"
आणि दिवस ठरला २६ .७.१०
आम्ही ठरवणारे कोण म्हणा?
नियतीन हे दान आमच्या पदरात टाकायचं जणू हे
आधीच ठरवलं होत, कदाचित आम्ही त्यावेळचे सारे
अतृप्त आत्मे जमा झाले होते ,पन्हाळ्यावर ,,,,,
महाराजांच्या पालखीचे भोई होण्याच पुण्य निदान
या जन्मात तरी मिळावं या आशेन सारे ट्रेकर्स (मावळे)
जमले होते
 "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ...........
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"
ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही सारे मुंबई हून निघालो,
पन्हाळ्यात पोहचलो सारे जन रात्र व्हयाची वाट पाहत होते
जणू खरोखर ,,,
आज पुन्हा सिद्धी जोहरने पन्हाळ्यास वेढा घातला आहे ,
आणि त्याच ओढीने सार्यांच्या उरात धड धड होत होती,
कारण सार्यांनाच त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार
व्हायचे होते ,
पालखीचे भोई व्हायचे होते ,,,
"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ...........
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"
पण ,,,
आयोजक त्यांना पदोपदी सांगत होते
हि वाट किती बिकट आहे
किती खडतर आहे
पण नाही,,,
सारे तळहातावर प्राण घेवून आले होते जणू
एक जण तर रात्री पालखी निघताना आला
त्याची मुलगी अत्यंत सिरीयस असतानाही आणि,,,
हट्टाला पेटला होता मला जायचच,,
आयोजक तर त्याला घ्यावयास तयार नव्हते,,
त्याने मला विचारलं काय करू,,,
मी त्याला गुरु मंत्र दिला ,,,,?
आणि त्याने दिलेला शब्द पाळला
रात्रीचा तो अवघड ट्रेक बिनबोभाट पूर्ण हि केला ,,,
आणि अचानक काही दिवसापुर्वीचा किस्सा आठवला ,,,
कसाब,,,,त्याला पकडल्यानंतर ,,,
बरेचसे एसेमेस आले ,
विश्लेषण आल कि त्यांनी आधीच ताज ची रूम
बॉम्बने भरली होती ,,,अत्याधुनिक शस्त्र होती,,,
त्यांच्याकडे अमुक होत त्यांच्याकडे तमुक होत,,
आणि तब्बल चार दिवस ते येथल्या
जवानांशी ,पोलिसांशी,सार्यांशी लढत होते
खरच त्यांची हि साधनसामुग्री पुरेशी होती ,,,?
आणि लक्षात आल,,, हे सार झूट ,,,त्यांच्याकडे
फक्त दोन शस्त्र होती,,,
१-ध्येय,,,
२- धर्मावर अढळ निष्ठा
या दो शस्त्रांच्या बळावर ते आम्हास भारी पडले
आणि गंमत पहा ,,,,, तीच दोन शस्त्र घेवून
हा आधुनिक मावळा पुन्हा
पन्हाळा आणि विशाळगडाच्या वाटेवर घेवून उभा होता 

त्याचे ध्येय होते ,,,
पालखी सुखरूप विशालगडी  नेणे,,,
आणि शिवशौर्यच्या धर्मावर अढळ निष्ठा ,,,,
त्याला माहित होत हि शस्त्र नेमकी कुठे चालवायची,,,
स्वामिनिष्ठा म्हणजे काय?
 ती कशाशी खातात  ?
ह्या शस्त्राना नेमकी धार कुठे येते?
महाराज येथेच का जन्मास आले?   
"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ...........
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"

बरोबर रात्रो १० वाजता हि पालखी निघाली
स्वामीनिष्ठेच बाळकडू प्यायलेले हे सारे मावळे
आणि काही रण-रागिण्या  हि होत्या बरका?
साक्षात आई भवानीच जणू ह्या
मावळ्यांच्या मदतीस धावून आली होती,,
त्यांच्या रुपात ,,,
मजल दरमजल करत अंधाराला कापत,
पावसाला पाठीवर झेलत
मुखाने शिवबांचा जयजयकार करत.
जणू महाराजांना सांगत होते
साकड घालत होते
महाराज पुन्हा या जन्माला या ,
महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारतवर्षाला तुमची गरज आहे.
आम्ही त्याच त्वेषाने पुन्हा गनिमांशी लढू
बास्स,,,  आपली कमी आहे....
"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ...........
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"
दुपारी बरोबर १.१५ ला पालखीच
पांढर पाणी येथे आगमन झाल,
सोप्प नव्हत ते ,,,
या वेळचा गनीम ,,,मोठा लबाड,,,
कधी साथीच्या रोगात ,
नातेवीकांच्या रुपात,
रागालोभात,
मोठ्या पगारात,
सगेसोयर्यात,
मुलांच्या शाळेत,
बॉसच्या रुपात असंख्य रुपात होता गनीम
त्यावर मात करत हे सारे मावळे आले होते
कारण,,,,,,

कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही......!"
"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ........... 
आणि ते सार या लोकांमध्ये होत,,,,, 
येथे खाली आपण पिकासावरिल लिंकवर क्लिक करून 
फोटो ही पाहु शकता 

&







 

2 comments:

  1. प्रिय सुनिल,
    तुझा लेख आणि पिकासावर टाकलेले फ़ॊटॊ दोनही छान. तुझी रांगडी भाषा मनाचा ठाव घेते. महाराज ग्रेट होत यात दुमत असण्याच काहीच कारण नाही. पण मनात एक शंका नेहमीच येते. त्यांना इतकी जिवाला जिव देणारी माणस मिळाली नसती तर..... आज महाराज आले तर आपल्या सारख्या माणसां कडुन काही चमत्कार घडवू शकतील?. जाती पातीच्या भेदभावात दूभंगलेला आजचा हा मराठी समाज त्यावेळी नव्हता हे महाराजांचे आणि महाराष्टाचे भाग्य.असो
    मी तुमच्या बरोबर येवु शकलो नाही याची मनात खुपच खंत आहे आणि नेहमीच असेल.

    ReplyDelete