हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत .
अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे .
अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत
चला तर मग,
या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर
घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें
कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही