Sunday, July 11, 2010

दुर्गराज रायगड

श्री शिव रायाय नमः
दुर्गराज रायगड यावेळी ६ जून ला सरकारने बंदी घातली
होती छत्रपतींच्या राजाभिशेकावर ,,,,
आणि ठरवलं जायचं आणि गेलो हि
या आधी हि रायगडावर गेलो होतो पण ,,
माझा मित्र शार्दुल याने मला रायगड दाखवला ,फिरवला
आणि मी अनुभवला तो ,,,
पावसाळ्याचे दिवस आम्ही सात जन रायगडावर गेलो
आणि नामदेवाच्या घरी मुक्काम केला ,
जगदीश्वराच्या मागेच आहे त्याचे घर ,,
पठ्या १७ मिनिटात रायगड चढतो,
रायगड,,,,
प्रत्यक्ष शिवभास्करावर जेथे सुर्यनारायण हि नतमस्तक होतो ,
तो रायगड ,,,
हिंदवी स्वराज्याची राजधानी ,
रायगड,,,
जिथल्या प्रत्येक दगड धोंड्याहून जगातील सर्व आश्चर्ये ओवाळून टाकावीत,
असा तो रायगड ,,,
ईथल्या रांगड्या मराठ्यांनी सह्याद्रीच्या मुलांनी
परकीय यवनांशी जीवात जीव असे पर्यंत जिथे लढले तो,
म्हणजे रायगड ,,,
परकीय आक्रमकान बरोबर आणि लंपट सत्ताध्शांशी
लढण्याचे बळ छत्रपतींना आणि त्यांच्या मावळ्यांना दिले,
तो रायगड ,,,
मराठी राज्य आजही ज्याच्याकडे अभिमानाने पाहिलं कि माण
ताठ अन ऊर भरून येतो,
तो रायगड,,,,
बाप जाद्यांची जहागीरदारी असतानाही म्लेनछांशी सत्तेसाठी
लोचट चुम्बाचुम्बी न करण्याचे बळ शिवरायांना ज्याने दिले,
तो रायगड,,,
रायारीचे रायगड करण्याची ताकद ज्याच्या कडे कपारींनी
मावळ्यांना दिली तो,
रायगड,,,
फिरंग्यांची झोप उडवली ती याच ,
रायगडाने,,,
दिल्लीचे जुलमी बादशहा ,
कपटी ईंग्रज ,धूर्त सिद्धी ,
पिसाट पोर्तुगीज,
आदिलशाही कुतुबशाही यांना ज्याने आव्हान दिले
तो रायगड,,,
महाराजांच्या राजाभिशेकाची बातमी ऐकून
विजापुरकारांचे कान बधीर झाले ,,,
ते याच रायगडामुळे ,,,
भूपती,गडपती,नरपती गजपती
या बिरुदावल्या ज्याच्यामुळे महाराजांना मिळाल्या
तो रायगड,,,
आणि हाच तो रायगड,,,
जिथे ३२ मण वजनाच्या सिहासनावर
महारष्ट्र भवानीचा हा सुपुत्र हिंदुपतपातशा ,
या पृथ्वीवरचा प्रती सुर्यनारायण ,
महाराष्ट्राच्या माणसात लढण्याचे स्पुल्लिंग चेतवणारा नृसिंहव ,
गो ,ब्राम्हण, प्रतिपालक, असा
लौकिक कमावणारा सर्वांचा लाडका शिवबा,
आणि,,,
"काशी कि कला जाती मथुरा मस्जिद भवती
गर,,, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी,,,"
हे ज्यांनी सार्थ करून दाखवले ते
शिवराय,,,,,
ज्यांच्या राजाभिशेकाच्या निमित्ताने आज शिवशाही अवतरली होती,
पण याच रायगडचे जे चित्र आहे खूप भयावह,,,
ईतसताः पसरलेला प्लास्टिकचा कचरा,
दारूच्या बाटल्या ,मटणाची हाड,
लिफ्ट मुळे सहज वर यायची सोय झाल्यामुळे
तरुण तरुणी वर येतात यथेछ धिंगाणा घालतात मौज मजा मस्ती करतात,आणि त्यांना पायबंद घालणारा कुणीही नाही ,,
मात्र छत्रपतींच्या राजाभिशेकाला बंदी घालायला सारेच आहेत.
हे हिंदुनृसिंह प्रभो आम्हाला माफ कर
जाताना आमच्या अंगात भरलस ते रक्त होत कि पाणी ?
असा प्रश्न पडतोय माफ कर....

No comments:

Post a Comment