||श्री शिव रायाय नमः||
युध्द एक कला
कॅप्टन राजा लिमये यांचे हे पुस्तक वाचायला मिळाले आणि
ते वाचल्यावर वाटल खरच का आपल्याला अमेरिकेची
ओबामाची पाठिंब्याची गरज आहे ?
आपण जर का आजची महासत्ता होऊ शकतो तर
उद्या व्हायची वाट का पहावी ?
आपल्या कडे जर
"प्रेमात आणि युद्धात" ची कला आहे तर का?
छत्रपती जर या कलेत ईतके हुशार होते
तर ते तंत्र आपण आज का राबवत नाही,,,?
या तंत्राचा वापर ठाई ठाई छत्रपतींनी दिला आहे.
त्यांनी कधी शत्रू पक्षाशी हातमिळवणी केली , तर
कधी त्यांना मूर्ख बनवल,
तर कधी त्यांच्याशी ते गोड बोलून,
त्यांचा काटा काढला .
तर कधी गनिमी काव्याने हल्ला केला .
तर कधी पाया पडून ,खर बोलून खोट बोलून
कधी निष्ठुर पणे वागून
हे ज्याला जमत तो युद्धत जिंकतोच जिंकतो
हे त्यांनी दाखवून दिल ,,,,,,
असाच साधारण अडीच हजार वर्षा पूर्वीचा काळ होता .
त्याकाळात चीन मधील"सन झु" नावाच्या सेनानीने
सर्वकष युध्द तंत्राचा वापर कसा,का, कुठे, कधी, कुणाविरोधात
याचे सारे तपशिला सहित लिखाण केले होते .
ते वाचून चीनच्या "वू" राज्याचा राजा "लु" याने त्याला
बोलवणे केले आणि आपल्या खास २०० महिला सैनिक यांना
हि शिस्त लावून कला शिकवावी असा आदेश दिला .
झाल "सन झु" आला त्याने
त्या २०० महिलांची विभागणी केली
आणि आपल्या सैनिकांद्वारे त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.
आणि आता ड्रम च्या तालावर हे सर करून दाखवा असा सांगितलं,
ड्रम वाजला कि डाव्या हाताला वळायचे. नंतर उजव्या हाताला
झाल ईकडे ड्रम वाजला पण त्या महिला काही वळल्या नाहीत,,,,,,,
"सन झु" म्हणाला मला वाटत तुम्हाला निट्स कललेल नाही अस दिसतंय,
असो मी परत करून दाखवतो बघा नीट
पण परत तेच त्या महिला तशाच उभ्या आणि वर हसत होत्या
कि काय दाए मूड बाए मूड चाललाय ?
असाच सुर होता
राजाही गालात हसत होता त्यामुळे प्रोत्साहन मिळत होत.
आता मात्र सन झु चिडला त्याने आपल्या सैनिकांना
आदेश दिला प्रमुख महिला अधिकाऱ्यांचे शीर धडावेगळे करा
ईकडे राजा घाबरला त्याच्या त्या लाडक्या सैनिकान पैकी होत्या त्या .
राजाने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला पण,,,
त्याला तिथेच थांबवण्यात आल,,,,,,,,
डोक धडावेगळ झाल आणि ड्रम मास्तर परत तयार होता
ड्रम वाजला आणि यंत्रवत हालचाल झाली आता
परत त्या महिला सैनिकांना वेगळ सांगायची गरज पडली नाही,
राजा कडे निरोप गेला ,
राजे साहेब आता तुम्ही येवून तुमच्या महिला सैनिकांची परीक्षा घेवू शकता .
राजा हि समजून गेला त्याने "सन झु" लाच आपल्या राज्याचा सेनापती केला
आणि अनेक वर्षे बिनधोक राज्य केले,,,,,,,,,,,,
हे सार सांगायचं कारण "सन झु" ने अप्रत्यक्ष्य रित्या जणू राजाला सांगितलं
कि एकदा का लष्कराच्या कारवाई संबंधी राजाने स्पष्ट आदेश दिला कि ,
मग ती कारवाई लहान असो व मोठी मग राजाने किंवा राष्ट्र प्रमुखाने
त्य कारवाईत अडथला आणू नये,,,,,,
हे सार आठवायचं कारण,,,,,,,
१९४८ मध्ये आपल्या देशात घडलेली हि घटना ,,
भारताची फाळणी झाल्या नंतर काश्मीर भारतात विलीन झाल्याचे
पाहताच पाकिस्तानने आपले लष्कर काश्मिरात घुसवून
संपूर्ण लष्करी कारवाई करून काश्मीर आपल्या ताब्यात घ्यायचा
प्रयत्न केला,,,,,,,
त्यावेळी तेव्हाच्या राष्ट्रीय नेत्यांनी विशेषतः
सरदार वल्लभभाई पटेलांनी भारताच्या सेना प्रमुखांना
काश्मिरातील पाकी लष्कराला हुसकवून लावायचा
आदेश दिला..
भारतीय सैन्याने पराक्रमाची शर्थ करून
प्रसंगी देशासाठी आपले रक्त सांडून,
पाकी लष्कराला काश्मीर बाहेर हुसकवून लावले .
ते अक्षरशः पळत सुटले ,
पण,,,,,,,,,,,,,,,,,,,,?
नेमके याच वेळी आपल्या अवसानघातकी नेतृत्वाने
पंडित नेहरूंनी हा प्रश्न युनोत नेला ,,,,,
आणि उनोने केलेल्या ठरावानुसार
एकाएकी लढाई थांबविण्याचे आदेश सेना प्रमुखांना आले .
आणि काश्मीरचा बराचसा भाग पाकिस्तानच्या ताब्यातच राहिला .
आपले लष्कर प्रमुख या प्रकाराने अचंबित झाले .
सगळी मेहनत वाया गेली ,,,
आता ते जाणार होते बाहेर तोच आदेश आला
सांडलेल सार रक्त वाया गेल ,
मेहनत वाया गेली आणि,,,
बळकावलेल काश्मीर त्यांच्या ताब्यात राहील ते वेगळच.
त्य राजकीय घोड्चुकीचे परिणाम आज हि
सारा देश भोगत आहे ,गेली ६० वर्षे,,,,,,,,,,
त्यावेळी तिथे एखादा "सन झु" असता तर ...
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत . तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू. जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही
Tuesday, November 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment