Monday, October 18, 2010

मां आशापुरा ,,माताणु मढ

|| जय भवानी जय अंबे||
मां आशापुरा ,,माताणु मढ 
आपली जशी भवानी माता तशीच कच्छी लोकांची
मां आशापुरा जिच्या पायी मस्तक ठेवलं कि सार्या आशा पुर्या होतात
आशी त्यांची मां आशापुरा
माताणु मढ आईचा गड असो देवीचा ईतिहास फारसा माहित नाही .
मी वेगळ्याच कारणासाठी हे दुर्गायान वर लिहित आहे,
आपल्याकडे जसे लोक चालत चालत पंढरपूरला जातात
तसेच हे सारे कच्छी लोक चालत उन्हातान्हाची परवा न करता .
आईच्या आशीर्वादासाठी कुणी
आपल्या कच्च्या बच्च्यांना कडेवर घेवून
मुंबईहून ,चालत ,सायकलवर , गाडीने,
कुणी बिना चप्पलचे, कुणी डोळे बांधून
कुणी रस्त्याने लोळण घेत, अक्षरशः जीवाचे हाल करत
स्वतःच्या ताकदीची परीक्षा घेत सारे लोक
जय आशापुराचा जयघोष करत येतात .आणि,
मोठ्या भक्तिभावाने मां आशापुराच्या पायावर डोक टेकवून धन्य होतात.
अशा या सार्या भक्तांची मुंबई सकट तिथलेही धनिक सावकार
राहायची, जेवायची, खायची, आंघोळीची कुणी दवापाण्याची,
अगदी अंथरून पांघरुणा सकट व्यवस्था करत.
प्रत्येक १ ,२ km वर मोठमोठे मंडप टाकून व्यवस्था करतात .
८\१० दिवस मग गावातील लोक येवून आपापल्या परीने मदत करत,
गृहिणी भाज्या चपाती बनवतात ,
मंडपवाला मंडप टाकतो जोतो आपापल्या परीने मदत करतो,
मी हि तिथे गेली १०\१२ वर्षे जात आहे
तिथल्या मेडिकल क्याम्प मध्ये मी मला जे थोडफार
मसाज , आयकुप्रेषर, च्या मदतीने दमल्या भागल्या लोकांची सेवा करतो
असो
सांगायचे हे कि तिथे मी दरवर्षी जातो पण कामाच्या वेळेत
मला जिथे नजर टाकता आली त्यापैकी
दोन महत्वाची स्थान तिथे आहेत अत्यंत मोक्याची आणि
सरकारची लक्तर वेशीवर टांगणारी
एक आहे  नारायण सरोवर ,,,,,
भारताच्या एका टोकापाशी अत्यंत रमणीय
श्री महादेवाचे कोटेश्वर महादेवाचे मंदिर,,,
आणि समोर हा मोठ्ठा समुद्र,,,,,,,,,
अगदी रात्रीच्या मिट्ट काळोखात म्हणे
(पाकिस्तान)काराचीतली लाईट हि दिसते.
ईतक्या रात्री पर्यंत मी थांबू शकत नाही कारण बरच काम मागे असत.
पण तरी देखील आजूबाजूला चौकशी केली आणि आपली
भारतीय जवानांचा मोठ्ठा फौजफाटा असतो ,
सरहद्दच आहे  ती तर अश्या सरहद्दीत दिवसाआड
पाकिस्तानातून मच्छिमार लोक मच्छिमारीच्या नावावर भारतीय
हद्दीत राजरोस प्रवेश करतात ,
साब गलती हो गयी, हम रस्ता भटक गये अस म्हणत हातपाय जोडतात
आणि आपले जवान मग त्यांना पकडून येथे ठेवतात
१५ ऑगस्ट २६ जानेवारी अशा दिवशी त्यांची
इमाने ईतबारे परत पाकिस्तानला पाठवणीहि होते , पण,,,
यातले बरेच लोक जातच नाहीत परत कारण त्यांना येथे
मुलबाळ झालीत येथल्या शाळेत ती जातात ,
या पाकिस्तानी लोकनी आपल येथे गावच बसवलय
लखपत ,,,,,,,
आणि दुसर ठिकाण
हाजीपीर दर्गा ,,,          
रेफ्यूजी,,,,,,,,,,,   

अभिषेक करीना अनिभित सिनेमात हि तो दाखवला होता         
या दर्ग्यातही पाकिस्तानातले मुस्लीम काहीना काही
कारणानिमित्त राजरोस पाया पडायला येतात आणि ,
ईथलेच होवून जातात
हम रस्त्यापासून अवघ ३२ km वर आहे हा हाजीपीर दर्गा,
येथला मुसलमान आणि तिथला मुसलमान
फरक तो कसा करणार?
मग राहतो तो येथे जवानांची नजर चुकवून आणि त्यातही
आपल्याकडे गद्दरांची कमी नाहीच काय करणार,
हे सार खूप सोप्प आहे,
मग होत गोध्रा मग होत गुजरात आणि आपले
नतद्रष्ट लोक नेमक गुजरात कडे बोट दाखवतात .
गुजरात मुळे मुसलमान भडकले असा प्रचार केला जातो ,
आणि आपले लोक हे का होत कस होत या कडे लक्ष  न देता.
हिंदूंना टिकेच लक्ष्य बनवतात ,
वास्तविक भारताच्या या सीमा तिथेही हे जवानांच्या
खांद्यांवर सर्वधर्म समभावाचे भिजत घोंगडे  टाकून
त्यांच्यावर बंधन आणली जातात.
एकीकडे त्यां जवानांना दिवस रात्र
पहार्यावर बसवायचं आणि दुसरीकडे त्यांनाच
या घुसखरोंवर कारवाई करण्यापासून रोखयाच
काय बोलणार ,,,,,,,,,?
उद्धवा अजब तुझे सरकार
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा
वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार,,,,,, 

येथे खाली पिकसावर आशापुरा चे काही 
फोटो पाहु शकता ,
You are invited to view sunil bhumkar's photo album: aashapura
aashapura
Oct 6, 2010
by sunil bhumkar
Message from sunil bhumkar:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5529429934453579921&authkey=Gv1sRgCPGQkvzyo4iRjgE&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
 

1 comment:

  1. #
    Prashant Mandpe likes this.
    #

    *
    Prashant Mandpe tumhi je lihlate an anubhavlet te jaljalit vastav aahe, je aapan nakaru shakat nahin an swikaruhi shakat nahin, karan dharmanirapekshatechi zapde aaplya dolyanvar basavli aahet, basavun ghetli aahet.
    31 minutes ago · Like

    ReplyDelete