Saturday, April 10, 2010

वढू आणि तुलापुर

||श्री शिवरायाय नमः ||
वढू आणि तुलापुर 
शंभाजी महाराजांचे तुलापुर आणि वढू
गुढी पाडवा,,,,,
हिन्दू नववर्ष दिन ,,,,याच दिवशी हिन्दू घरोघरी गुढ्या उभारतात
तोरण लावतात, पताके, झेंडे नाचवतात.
हेच ध्यानात घेवुन क्रूर कर्म्या औरंग्याने आजचा दिवस निवडला होता ..
आज संध्याकाळी त्या काफर संभाजिचा खातमा करून
हिन्दुना प्राणाहुन प्रिय राजाची त्याच्या मस्तकाची गुढी भाल्यावर टोचून नाचवुन दाखवू
बहादुर गडावर (मौजे पेड्गाव.ता.श्री गोंदा)
संभाजी महाराजांची धिंड काढली गेली एका बोडक्या घाणेरडया  उंटावर
संभाजी महाराज व कवी कलश याना उलटे बसवले होते
साखळ दंड़ाने बांधलेले ,दोघांच्या ही अंगावर विदुषका सारखे
कपडे चढवले होते .
गल्यातिल शिवरायानी घातलेली कवडयाची माळ काढून
गुरानाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी  बांधलेली होती ,
दोघांच्या ही डोक्यावर एखाद्या अत्तल गुन्हेगाराला बंधाव्यात अशा
कुरान मधे सांगितलेल्या आदेशा नुसार ,
ईरानी लाकड़ी टोप्या बसवल्या होत्या ,
 त्याच प्रमाने "तख्ते कुलाह " म्हणजेच लाकड़ी फल्यांचा खोडा
मानेवर ठेवून दोन्ही हात बांधले होते .
त्या खोड्याला घूंगरे बांधली होती, आणि त्यावर छोटी छोटी निशाण चितारली होती.
अशी ती विदुषकी धिंड  मोंगली फौजां मधून काढली होती .
त्यावेळी त्या मोंगालन मध्ये  त्यांच्या पवित्र ईद सारखे उस्साहाचे वातावरण होते .
दुर्तफा उभे असलेले सैनिक महाराजांवर आणि कवी कलशांवर,
दगड भिरकावत होते. भाल्याने टोचत होते , नगारे वाजवत होते,
कर्ने थरारत होते, ईमामांचे झेंडे फड़कत होते,
रायगड चा राजा, महाराजांचा जीजाऊंचा शंभू बाळ...
रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
 लगोलग औरंग्याने आपला मुक्काम ,
तुलापूर येथे हलवला.
या तुलापुरच्या संगमावर त्याला राजास हलाल करावयाचे होते.
महाराजांची तेजस्वी नेत्र कमले काढण्यासाठी
हषम सरसावले ,,
रांजनातुंन रवि फिरवावी तसे , तशा त्या तप्त सल्या महाराजांच्या
डोळ्यातून फिरवल्या गेल्या ,,
चर्र चर्र करीत चेहर्या वरील कातडी जाळली गेली,
सारी छावनी थरारली पण ,,,,?
महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेर ही उमटली नाही.
यामुले औरंगजेबचा परा वाढला त्याने कवी कलशांचे ही डोळे
काढले गेले ,
बलिष्ठ शरीरयष्ठिचा एक पठान कवी कलशांच्या छाताडावर बसला ,
आणि दुसर्याने त्यांचे पाय उसाचे कांड पीळगटावे तसे
पीळले , दोघानी मिळून मग कविराजंची मुंडी धरली ,
त्यांच्या जबड्यात हात घातला, कविराजंचे मुख रक्ताने भरून गेले होते ,
त्या पठानाने त्यांची जीभ हाताने खसकन खेचून काढली ,,
दुसर्याने ती वितभर बाहेर आलेली जीभ कापून काढली.
कवी राजांच्या तोंडातून रक्ताचा डोम्ब उसळला .
संभाजी महाराजांची जिव्हा ही अशीच छाटली गेली .
पहनार्यंचे ही डोळे पांढरे पडले.
आसुरी आनंदाने अवघी छावनी गर्जत होती.
कवी कलशां वरील आत्याचार ही महाराजां वरील
अत्याचाराची रंगित तालीम असायची .
संध्याकाळ झाली .शंभु महादेवस खांबास घट्ट बांधून ठेवले होते .
महाराज उभे होते एखाद्या ,
स्वाभिमानाने तळपत असणार्या तेजस्वी योग्या सारखे,
ज्यांच्या तेजाने शेष ही डल मलून जावा अशा तेजस्वी श्री कृष्णा सारखे,
अविचल अभेद्य ,,,,,,,,
आभालात अभिमानाने मस्तक उंचावुन  बाणेदारपणे
उभा असलेल्या रायगडा च्या  टकमक टोका सारखे.
दोन दैत्य पुढे सरसावले ,,
एकाने पाठीच्या वरच्या मणक्या पासून
आणि दुसर्याने समोरून गल्या पासून ,
राजांच्या अंगात वाघ नख्या घुसवल्या,
त्या राक्षसांना  जोर चढावा म्हणून कुरानातिल
आयते वाचले जात होते , रण वाद्यांचा दनदनाट होत होता.
"दिन दिन "आणि "आल्लाहू  अकबर" च्या घोषत राजांची
त्वचा डालिमबाच्या साली सारखी सोलली जात होती.
जास्वंदी सारखा लाल बूंद देह यातनानी तळमळत होता.
रक्त मासंच्या चिंध्या होत होत्या.
संपुर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फारशा व खांडे पेलत,
दोन गाझी (धर्मवीर) पुढे आले,
त्यानी त्यांचे हात आणि पाय एक एक  करत अवयव तोडून टाकले ,
दुसर्याने खंड्याचे धारदार पाते महाराजांच्या मानेत घुसवले,
व हलू हलू कुरानातिल आद्न्ये प्रमाने  "हलाल "करीत
शिर धडा वेगले केले.
हाच तो गुढी  पाडवा या हिन्दुस्तानत मुसलमानानी राजांची मुंडी
भाल्यात अडकवुनं गुढी उभारली
आणि आम्ही ,,,,?
तुमच्या स्मरणार्थ वढू  तुलापुरस तर सोडा(माहित असेल की नाही?)
पण तुमच्यासाठी दोन फूल ही वाहत नाही
आम्हाला क्षमा करा क्षमा करा
tulapur vadhu
Mar 14, 2010
by sunilbhumkar12
Message from sunilbhumkar12:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
 




                                       

1 comment:

  1. सुनीलजी, आपला ब्लॉग मराठी ब्लॉगर्सच्या यादीत जोडला आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete