Thursday, April 1, 2010

वाकड गाव जत्रा

||श्री म्हातोबा प्रसन्न ||
म्हातोबच्या नावन चांगभल चांगभल ,,,,,
ह्या आवाजान  सार्या गावकर्यांच्या अंगात एक जोश संचारतो आणि
एक गोंधळ उडतो पैंज पैंज हुई हुई ,,,,
खोबर अन भंडार्याने सारा आसमंत हळदिच्या रंगात सोनेरी दिसतो
आणि त्यातच गळकर्याच आगमन होत आणि आक्खा गाव
अगदी तान्ह्या मुलासकट देवाच्या पायावर लोटांगन घेतो
आपला सारा विश्वास, सार भय, आनंद, समस्या, पायावर वाहतो.
चैत्र पौर्णिमा ..हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमा .. छ्त्रपैतिंची पुण्यतिथि
काय साम्य आहे पहा दोघांच्या ही नावे शत्रु चळ चळ  कापत होता
रावण आणि औरन्गजेब तसा फरक होताच कुठे?
असो ,,
एक गळकरी आणि दोन खांदेकरी अआनी सारे गावकरी ,
अशी धम्माल अवस्था असते कुठ ही जा
चांगभल आणि पैंज पैंज च घोष चालू असतो
वाकड हिंजवाडी यांचे ग्राम दैवत असलेल्या
म्हातोबा देवाचा उरुस असा जोशात साजरा होतो .
या आमच्या गावाला बगाडाची जुनी परम्परा आहे .
या बगाडा वर हिंजवडी  गावाचे ,,,
श्री जांभूळकर आणि सखारे परिवाराकडे याचा मान आहे.
या वेळी तो मान श्री शंकर जांभूळकर यांच्या कड़े होता .
त्यांनाच गळकर्याचा मान आहे .
पाठीत तीन तीन पंच धातुचे गळ टोचले जातात.
हिंजवडीच्या मारुती मंदिरात हे गळ टोचले जातात .
त्यानंतर होलीच्या मालावार आणले जाते
गळ कार्याची बहिन डोक्यावर पाण्याची घागर घेवुन येते ,
खांदेकरयान्ना बगाडाच्या दोन्ही बाजूला 
लटकवलेल्या दोरीवर दोघांना बसवले जाते 
मग हे बगाड वाजत गाजत लोकवस्तीतुन  फिरवत गावात जाते 
आधी भुमकर वस्ती, देवकर वस्ती, भुजबल वस्ती 
गावात प्रवेश होतो ,,
या तिन्ही वस्ती तुन विट्ठल मंदिराजवळ च्या मैदानात 
मंदिरातून आणलेल्या पालखीची भेट होते 
मातंग समाजाच्या पुरषाची मांडी आणि स्त्रीचे मनगट कापले जाते .       
या बगाडांना आपापले बैल जोडले जावेत यासाठी मोठी चुरस असते.
पण हलू हलू ही चुरस कमी कमी होऊ लागली आहे हे जाणवतेय
कारण आता आमच्या कड़े पैसा भरपूर म्हणजे पूरा सारखाच आला आहे
आमच्या गावात आजकाल शेती हा प्रकारच राहिला नाही 
आता शेती होते पण,,,
घरांची  बिल्डिंगची ,,,,यात बैलाचे ते काम काय?
बैल तर पुढच्या वर्षी ही येतील पण भाड्याने ,,,,
त्यात असेल मगरुरी पैशाची मस्ती माज असेल तो श्रीमंतीचा.. .
पण देवा बाबत एकी आणि विश्वास ? तो मात्र कायम असेल 
तो पीळ आजही दिसतो जाणवतो 
असो ,,
हे सर्व आज सांगायचे कारण ,,,
जरा मागे जातो म्हणजे नेमके,,
१९९० सालात,,,,त्यावेळी ना मोबाईल होता ईंटरनेट 
लोकसत्तात हे प्रकरण खुप गाजले होते ,
अंधश्रध्हा निर्मूलन समिति ,,,
तिने वृत्तपत्रात हा सारा प्रकार अघोरी आहे 
हे सार अमानवी आहे 
देव वगेरे अस काहीही नसते 
असे सारे छपून आणले आणि एक प्रकारे हा सारा प्रकार आता 
सरकारने च लक्ष घालून बंद करावा असे सांगण्यात आले,,,
आज बरोबर ,,,,२० वर्ष झाली या गोष्टीला 
त्यावेळी वृत्त पत्र हाच आधार होता 
तेव्हाचा हा पत्र व्यवहार ,,,,
अंध श्रद्धा निर्मूलन समिति कसे फक्त हिन्दू धर्मास आणि परमपरेस
मांजरी सारखे आडवे जाते त्याचा हा पुरावा 
हो पण ह्या सार्या प्रकारात समितीने जे तोंड काळ केल ते आज तागायत 
आमच्या गावात परत फिराकलेच नाहीत 
आम्ही स्वतः त्यावेळी ५०००० रु.चे बक्षिस लावले होते 
अंध श्रद्धा समितीने आव्हान स्वीकारुन ही की आमच्या गावात आली नाही 
आणि चंद्रसेन टिलेकर नावाच्या सद्ग्रुहस्थाची मी कशी भंबेरी उडवली वाचा 
 परत या सर्यानी तोंड उघडल नाही  
















wakad gav urus jatra
Mar 28, 2010
by sunilbhumkar12
Message from sunilbhumkar12:
These pictures were sent with Picasa, from Google.
Try it out here: http://picasa.google.com/
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5454849913560872593&authkey=Gv1sRgCKCxq4_dtp3axgE&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
 

No comments:

Post a Comment