Wednesday, June 2, 2010

श्री शिव राजभिषेक

|| श्री शिव रायाय नमः ||
रायगडावर ६ जून रोजी सरकार आणि पुरातत्व खात्याने 
गडावर छ्त्रपतिंचा राजाभिषेक सोह्ल्यास बंदी घातली
बातमी वाचली आणि सुन्न झालो या इथे रायगडावर 
आम्ही छ्त्रपतिंचा राजाभिषेक  सोहाला नाही साजरा करायचा तर तो कुणी करायचा?
आणि कुणाचा करायचा ? त्या पापी औरंग्याचा ?
रायगड काय पुरातत्व खात्याच्या बापाची जहागिरी आहे?
का ही मोगलाई आहे?
आम्ही जगत आहोत तो महाराष्ट्र देशच आहे ना?
अरे आम्ही जिवंत तरी कसे म्हणावे स्वतः ला ?
का आम्ही जन्माला तेच मुली मेल्या आईच दूध पिवुन?
आणि  दूर कुठे तरी,,,,
रेडिओ वर स्वर ऐकू आले कवी सुरेश भटांचे शब्द नव्हे अंगार होते ते ,,,
आणि पेटून उठालो त्या क्षणी जेव्हा मी ते गाण  ऐकल ,,,
"इथे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली ,
अरे पुन्हा आयुष्याचे पेटवा मशाली",,,,,,,,,
आणि ठरवल पुरातत्व खात्याने  किती ही बंदी हुकुम लादला तरी ,,,
तो मोडून रायगडावर जायचे मग तो जाणारा भले मी एकटा का असेना  
पण जाणार,,,,,
आणि भराभर मित्रांना फोन केले 
आणि वेडात वीर दौडले सात ची आठवण झाली 
आम्ही सारे आठ जण तयार झालो उद्या ४ तारखेला रात्री 
रायगडावर जाणार आहोत 
आमचे तारखेचे आणि तिथिचे वाद बासनात गुंडालुन ,,,,,
कारण महाराजांचा राजाभिषेक हा आमच्या वादापेक्षा मला मोठा वाटला 
आणि त्यात ही उद्या सरकारने ,,,
१९ फेब जशी महाराजांची पुण्यतिथि आपल्यावर लादली आणि ,,
महाराष्ट्रात ३\३ जयंत्या साजर्या होऊ लागल्या 
तसेच राजाभिषेकाच्या बाबतीत झाले तर ,,,,,,,,,?
अरे महाराज आमच्या तोंडात शेण घालतील 
म्हणतील कशाला मी या नादान महाराष्ट्रात जन्म घेतला?
कुणासाठी आणि का लढलो?
असे होवू नये असे वाटत असेल तर सार्या शिव प्रेमिनी
६ तारखेला रायगडावर जमुन पुरातत्व खात्याला आपली ताकद 
दाखवण गरजेचे आहे ,,
इथे मला,
मध्यंतरी भालजी पेंढारकरांचा वाचलेला एक किस्सा आठवतो ,,,,,,,,
एक दिवस कोंग्रेस्सी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भालजीना बोलावले 
व सांगितले आम्हाला 
शिवाजी महाराजां वर सिनेमा काढायचा आहे भालजी म्हणाले काढू की ,
त्यात काय मोठ्ह?  आणि त्यानी सार ते तयार करून ते 
मुख्यमंत्र्यांना दाखवले  त्यावर चव्हाण म्हणाले,
सिनेमा तर चांगला जमलाय  पण एका करा त्यात तो जरा ,
अफजल खान वधाचा सीन तेव्ह्डा काढून टाका
काय आहे की काही लोकाना ते आवडणार नाही त्यांच्या भावना 
महत्वाच्या त्या जपल्या पाहिजेत  ,,,,,,,,,?
भालाजी खरतर खुप रागीट आणि कड़क शिस्तिचे 
पण ते ही हे ऐकून अवाक् झाले  ,,,,,, तरी ते शांत पणे म्हणाले 
तुमच ठीक आहे हो हे नको ते नको सहज बोलता ,
उद्या तुम्ही मला रामायणा वर  सिनेमा काढा म्हणाल,
मी तो काढीनही मग तेव्हा म्हणाल ,
अरे बाबा तेव्ह्डा तो सीता हरनाचा प्रसंग तेव्ह्डा काढ काही लोकाना 
ते नाही आवडणार त्यामुले रावणाची प्रतिमा ख़राब होते 
मग मला सांगा सीता हरण कुणी करायच?
मी की तुम्ही? मग रामायण घडणार ते क़स?
आणि हेच असच सत्य दडपायाच काम 
कोंग्रेस वाले ईमाने ईतबारे करत आलेत    
मित्रानो असे हे कोंग्रेस सरकार याना फक्त हिंदूंच्या सोडून 
इतरांच्या भावना जपन जमात आणि या धामधूमित ही आपला 
राज्य सभेवर चौथा उमेदवार कसा निवडून जाईल?
याचीच चिंता याना आहे ,
यांच  महाराजांशी काय घेण देण?
तेव्हा या पुरातत्व खात्याला रायगडावर पुरन्या साठी ,
आणि महाराजांच्या तत्वांची पयाम्मली करणार्याना 
गाडन्या साठी,
तुम्ही आम्ही सार्या शिव प्रेमिनी रायगडावर जमणे  गरजेचे आहे
पुन्हा एका हात जोडून नम्र विनंती 
कृपया तारीख आणि तिथीचा वाद घालून 
आपली ताकद कामी करून घेवु नका 
एक दिलान या सारे या 
आई भवानी आपणा सर्वास दीर्घायु देईल
ता. क. हे सार लिहित असताना मित्राचा फोन आला 
त्याने सांगीतल की सरकारने परवानगी या सोह्ल्यास परवानगी दिली आहे 
तेव्हा या ढोल ताशांच्या गजरात या एका जल्लोषात या 
आई भवानी तुमची वाट पहाते आहे अहो तिच्या लेकराचा
उद्या ६तारखेला राजाभिषेक  आहे 
या बर का आई भावनी वाट पहाते आहे
||जय भवानी जय शिवराय|| 
दोन माकडांच्या भांडनात बोक्याने लोणी पळवू नये हीच इच्छा
लई मागन न्हाई देवा ऐय्क डाव इच्छा पूरी करा   

 
 

No comments:

Post a Comment