Thursday, March 18, 2010

जंजीरा ,,

||श्री शिवरायाय नमः||
जंजीरा ,,
पद्मदुर्ग पाहून परत किनार्यावर राजपुरिला जाव आणि दुसर्या बोटीत
बसून जंजिर्यास जावे
खर तर हा मेढेकोट(मोठ मोठे ओंडके जमिनीत रोवून बंदिस्त केलेली जागा.
बुर्हरान खान मूळचा अस्बेशियन हबशी
त्याने याचे नामकरण केले
जझिरे मेहेरुब जझीरा चा पुढे अपभ्रंश झाला जंजीरा ,,,  
दरवाजाच्या एका कमानिवर पांढर्या दगडावर कोरुन एक शिला लेख लिहिला आहे
तो अरबी भाषेत आहे,
कमानितुन आत आल की उजव्या हाताला वाघाचे शिल्प आहे ,
त्याच्या चार पायात आणि एक तोंडात ,एक शेपटित
असे सहा हत्ती पकडलेले आहेत
डावीकडील भिंतीवर एक सिहिं आणि मागे वाघ असे चित्र आहे
जरा पुढे गेल्यावर मंदिर सारखे एक बांधकाम आहे
त्याला पूर्वी "राम पंचायतन" म्हणत आता ,,,?
"राम पंचायतन पीर बाबा "म्हणतात आणि आम्ही ,,,?
मोठ्या भक्ति भावाने त्यास हात ही जोड़तो .....................?
जशी लायकी तसे सरकार काय करणार?
दोन मोठे तलाव आहेत,
३ अजस्त्र तोफा आहेत ,
कलाल बांगडी,चावरी, मग लांडया कसाब 
त्या पैकी लांडया कसाब ही पेशव्यानी इथे आणली
पण जंजीरा जिंकन शक्य न झाल्या मुले ती तोफ 
इथेच सोडून जाव लागल...    
छत्रपतीं पासून स्पूर्ति घेवुन एकंदर १४\१५ वेळा हा किल्ला जिंकायचा प्रत्येकाने केला
पण हाय रे दैवा दरवेळी आपण अयशस्वी झालो
किल्ला अजिंक्य राहिला स्वातंत्र्य नंतर मात्र
सरदार पटेलांना हे जमल जंजीरा संस्थान भारतात विलीन करण्यात
यशस्वी झाले.
कोल्यांचा राजा राम पाटिल याला निजाम शहा याने पिरमल खान
यास पाठवून दगा करवून दारू पज्वुन किल्ला ताब्यात घेतला
(दगा हाच त्यांचा धर्म )
१-त्यानंतर महाराजानी पहिली धड़क दिली
पण अपयशी ठरली ,,
२-मग शामराव  नीळकंठ पेशवे याना महाराजानी मोहिमेवर पाठवले,
पण इथे ही  बुर्हरान खान याने दगाच केला विश्वास घाताने त्याना कैदी केले  ,,
३-त्यानातर मोरोपंत पेशव्याना महाराजानी धाडल
त्यानीच हा जल दुर्ग पद्मदुर्ग उभारला आता मात्र
जंजीरा  स्वराज्यात येणार च असे वाटत होते तोच
या सिध्याने औरंगजेबच्या  मदतीने  घात केला
४-मोरोपंतानी पुन्हा डाव मांडला ,
कारण छ्त्रपतिन्ना हे शल्य डाचत होते पण डाव याही वेळी,,,
५-आता राजे सिंहासनावर बसले
त्यानी पुन्हा एकदा प्रयत्न केला यावेळी या सिध्याने पोर्तुगिझांची
मदत घेतली आणि किल्ला ,,,
६- आता पाली होती शंभाजी राजांची ,,,
महाराजां नंतर शंभाजी  गादीवर आले,
सिध्ही कासम दाद देत नाही हे लक्षात येताच
(हाच साम्राज गड )राजपुरिचा डोंगर फोडून खाड़ी बुजवण्याचा
हुकुम दिला आणि रास्ता तयार केला आता किल्ला आलाच
असे म्हणत असता स्वराज्यावर औरंग्याने हल्ला चढवला
आणि जंजिर्यावर पाणी सोडाव लागल
७-कान्होजी आंग्रे आणि पेशवे हे ही अयशस्वी झाले
८ -पुढे तर नानाजी सुर्व्यनी सिध्यलाच थर मारले तरी ही,,,
९-नाना फडनिसानी सिध्हिचा वारस बालुमिया याला आपल्या कड़े वळवले
तरी मोहिम अयशस्वीच झाली
महारांजांचे स्वप्न अपुरे राहिले
जंजीरा  अजिंक्यच राहिला..आणि आजही 
तिथे "छत्रपति शिवाजी महाराज की जय "
अशी घोषणा नाही देवू शकत
 

sagari killye
Feb 19, 2010
by sunilbhumkar12
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5449994824042605297&authkey=Gv1sRgCIvu9biD--jRIg&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
     

1 comment:

  1. धन्यवाद सुनील, आपण खूप महत्वाची अन खरी माहिती देताय...
    आपणास अन्य जेवढया दुर्गाबद्दल माहिती असेल ती देखील मांडवी ही विनंती...
    __विक्रम धर्माधिकारी

    ReplyDelete