Saturday, March 6, 2010

शिवजयंती


||श्री शिवरायाय नमः ||
काल परवाच सरकारी शिवजयंती १९ फेब,ला साजरी झाली. आता उद्या आणखी एक साजरी होणार व्वा मज्जा आहे म्हणत मी डोळे मिटले .
२\३ जयंत्या कुणाच्या नशिबात असतात? 
उद्या काय काय धम्माल करायची ते स्वप्न रंगवत असतानाच,,,,,आक्रित घडल,,?
स्वप्नात मझ्या चक्क महाराज आले का खोट वाटत ?
अहो मझ्या स्वप्नात जिन्ना येतो तर महाराज का येणार नाहीत ?
आणि म्हणाले माझ काम आहे तुझ्या कड़े करशील ना ?
मी म्हणालो महाराज अस काय म्हंताय?
तुम्ही हुकुम करायचा आदेश द्यावा महाराज ,,
महाराज- नाही रे बाबा आज काल हुकुम करायची आदेश द्यायची पद्धत राहिली नाही,,
जो तो आपापल्या मनाचा मालक झालाय ,,
महाराष्ट्रतील  एका नेत्याला मी हे वरदान दिल होत,,,
पण त्यान आपल्या हातान घालवाल,

जावू दे काम एक खाली निरोप दे एव्हडा माझा           
सुनील अरे माझ स्मारक करणार आहेत म्हणे सागरात ३५० कोटि खर्चून ?
त्यापेक्षा अरे मी जे गड किल्ले बांधले त्याची डाग डुजी करा म्हानव?
प्रत्येक किल्ल्यावर शंकरासमोर नंदी असावा त्या प्रमाने एक मशीद आहे ती हटवा म्हानव?

अरे ती मशीद सुद्धा तुम्ही माझ्याच नावावर खपवताय?
आयुष्यभर त्या यवनांशी लढलो कि रे मी! 
तुम्ही मात्र एखादा कुठे मुसलमान पदरी ठेवला त्याच च भांडवल करत आहात ?
अरे साध माझ्या पुतळ्याला हार कुणी घालायचा यावर वाद होतात ?
ते थांबवा आता सांगशील ना? 
अरे माझाच पुतळा व्हायची वेळ आलीय आता ,
सांगशील ना एव्हड़?
इतिहास संशोधक ही जातच नामशेष करा याना एव्हड़ डोक्यावर घेवु  नका 
एक वाक्यता नाही ती कशात?
आणि सर्वात महत्वाच ,,,,
तो माझा जन्म-तिथीचा वाद मिटवा आता,,
बस करा हे २\४ वेळा माझी जयति साजरी करण
नाही तर माझी पुण्यतिथी हि २\४ वेळा साजरी कराल,,
कारण पुन्हा रोज जन्मायला आवडेल नक्कीच
पण तुमच्या करणीन जे मारलं आहे ते अस २\४ वेळा नको
कधी कधी लाज वाटते आपण कुणासाठी हे हिंदवी स्वराज्याच स्वप्न पाहिलं होत?
सुनील,
अजुन तरी मी मेलो नाही सुनील लोकांच्या हृदयात जिवंत आहे 
मात्र तुमच वागन बघून मी अजुन जिवंत कसा हाच प्रश्न पडलाय?
कारण आता तुमची पुन्याई आता कमी झालीय तुम्हाला मदत करायला आलेला मी शेवटचा ,,,
आताशा देवालाही तुमचा कंटाळा आलाय
दरवेळी अवतार घेवुन त्याने तुम्हाला वाचवायचे धंदे सोडून दिलेत .
एव्हाडा निरोप दे जातो मी आणि हो ते पुन्य तिथीच आठवणीने सांग रे बाबा 
मलाच माझी खुप लाज वाटु रहलीय सांगशील ना ?
मी हो म्हननार इतक्यात मला,,,
ढोल लेझीम नगारे ताशे आणि कुठे बेन्जो तर कुठे डिजे च्या
तालावर चिकणी चमेली , उला ला ला, करत,,
महाराजांची
मिरवणुक निघालेली पहिली माझी झोप उडाली होती
करण मिरवणुकीत महाराज कपाळाला हात लावून बसलेले दिसत होते

मला म्हणत होते ,"असा अपमान उभ्या महाराष्ट्रात कुणाचा झाला नसेल रे?"
देवा पुन्हा या महाराष्ट्रात जन्म नको यांच्यात ,
माझ्या जन्मा विषयी एकवाक्यता नाही उद्या मरणात असेल कि नाही शंका आहे,,  


No comments:

Post a Comment