Saturday, March 6, 2010

शिव ज्योत

||श्री शिवरायाय नमः||
परवाच मी म्हणालो महाराज माझ्या स्वपनात आले आणि 
म्हणाले माझ्या २\३ जयंत्या होताहेत आता २\३ पुण्यतिथि ही साजर्या करा 
वैगरे ,,,,,
आणि दुसर्या दिवशी माझा मित्र समीर दळवी आला आणि म्हणाला ,
सुनील थांब जावू नकोस कुठे रायगडा वरून  शिव ज्योत येणार आहे मी म्हणालो ठीक आहे 
आणि शिव ज्योत दुपारी आली आणि पार्श्वभूमीवर 
"वेडात मराठे वीर दौडले सात ,,,,"गाण वाजत होत माझ्या सार्खायाला हे सार भारावून टाकणार होत.
हे सार पाहून कालची माझी उद्विग्नता कुठच्या कुठे पलुन गेली
ही कुठली ताकद ह्या मुलांना २४० किमी धावायला तयार करते?
रायगड ते लालबाग एका दिवसात २४०किमि ?
इथे २.४० किमी सलग चालता नाही येत आम्हाला 
आणि हे धावत आले ? कशाच्या जोरावर? 
आणि वाटल आत्ता महाराज इथे असते सांगीतल असते ,महाराज असे नाराज होवू नका 
पण सांगायच क़स ? प्रत्येक मुलात मला महाराज दिसत होते 
तुकाराम महाराजांच्या भक्त समुदायत यवनांना प्रत्येक भक्तात जसे महाराज दिसत होते        
माझी अवस्था तशीच झाली होती. मला त्यांच्या 
मनात , डोळ्यात ती शिवज्योत धगधगताना दिसत होती.
जणु ते सांगत होते काही काळजी नको सुनील ही ज्योत अशीच तेवत राहिल .
जणु त्यांच्या रुपात महारज मला सनागत होते ,
हे असे वेडात दौड़नारे वीर मराठे अजुनही माझ्या सोबत आहेत तो पर्यंत 
"यावचंद्रो दिवाकरो मग कुठलही टिनपाट सरकार माझी जयंती 19feb ला करो
अथवा कुठल्या संशोधकाने काहीही सांगो 
मला ना पुण्य तिथिची आस आहे ना मझ्या जयंतिची  हे सार साजर करण्या पेक्षा 
मी आयुष्यभर यवानांशी  आणि आपल्यातील गददारांशी लाढलो, का लढाव लागल,
हिन्दवी स्वराज्यासाठी लढलो, मराठ्यन्सथी साठी लढलो 
मला राजाभिषेक का करवून घ्यावा लागला 
यवन आणि इतर इंग्रज वैगेरे मला राजच मानत होते 
मानत नव्हता ते तुम्ही,,,,
तेव्हा जमलच तर हे माझ कार्य प्रत्येकाला समजावून सांगा
माझी जयंती अथवा पुण्यतिथि नाही अरे ह्याच प्रश्नावर 
मुल शाळेत नापास होता रे इतिहासाला सनावल्यात नका बांधू
किचकट होतो गुंता वाढतो माझ कार्य राहत बाजूला आणि जयंती साठी 
भांडन होतात.अंतिम सत्याच्या नादात आहे तो ही इतिहास पुसला जातो    

No comments:

Post a Comment