||श्री शिवरायाय नमः ||
१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात .
कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज
यांना मुली आवडत नाहीत
हे बाबासाहेब पुरंदरे याना खुप मानतात
??
काही म्हणी आणि वाक्प्रचार :
खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!
१.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात .
त्यातही french beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या .
काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)
२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)
२.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)
३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
*सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टूम्हणतात . - त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
- शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट ,
- Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट ,
- कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,
- पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर /
- मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
- शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब ,
- डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)
४.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
- सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
- शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
- शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand
- शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह
५.अन्य विशेष लकबी:
- हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात ,
- पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात :)
- ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत ....
- साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात .
- कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पण,,,
- किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :)
- त्यातही त्यांची फारशी चूक नसते . रात्री उशिरा निघणे,
- वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
- बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात :
- आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप
- इत्यादी इत्यादी ,,,,
- यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते ,
- एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी,
- तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी ,
- तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :)
- यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते :,,
- यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते .
- एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :)
- सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .
कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड .
बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते .
बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर
- डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून
- बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही
- ७.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:
- खणखणित आवाजात पोवाडे गाणे
- जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
- बैटिंग ला जाणे :)
offcourse शिवाजी महाराज
रायगडचा जगदीश्वर
हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .
९.यांची तिर्थस्थळे:
राजमाचीचा तलाव
९.यांची तिर्थस्थळे:
राजमाचीचा तलाव
बाण चा ब्लू लगून
नाणे घाटातील केव्ह
कोंकण कडा इ . इ . आणि हो,,,,
*ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते
त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे
निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन
बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज
यांना मुली आवडत नाहीत
हे बाबासाहेब पुरंदरे याना खुप मानतात
??
काही म्हणी आणि वाक्प्रचार :
खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!
No comments:
Post a Comment