||श्री शिवरायाय नमः||
आषाढ़ शुध्ह एकादशी पासून कार्तिक शुध्ह एकादशी पर्यंत
किंवा
आषाढ़ी पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमे पर्यंत च्या
चार महिन्यांच्या काळाला "चातुर्मास" म्हणतात.
श्रावनाताले चार सोमवार म्हणजे पर्वणीच
या काळात भगवान शिवशंकाराचे दर्शन
अहो घ्यायच मी काय सांगावे?
माझा खर्या अर्थाने पहिला ट्रेक झाला तो नकळतच
भीमाशंकर,,,
माझा मित्र मनोज कासवा याने विचारले भाऊ येणार का भीमाशंकर ला ,
माझा मित्र त्याचे वाढदिवस असेच डोंगरा वर जावून साजरे करतो ,,
येता का?
मी म्हणालो ठीक माझ्या माहिती प्रमाने त्याच्या कड़े गाड़ी होती
मला वाटल तो आपल्याला गाडीने भीमाशंकर ला घेवुन जाइल ,,,?
पण कसल काय,,, त्याने एका कर्जतच्या बस मध्ये कोंम्बल
रात्रीचा प्रवास करून दोन तास स्टेशन वर काढून ,
सकाळी सकाळी आम्ही निघालो एका सहा सीटर गाड़ी पकडली
आणि खांडस ला पोहचलो
आणि खर्या अर्थाने माझी दुर्गायनाला सुरवात झाली
मग गणपती घाट मार्गाने
गर्द जंगलाच्या सानिध्यात ,नशीब चांगले असेल तर
शेकरू (मोठी खार) चे ही दर्शन घडते वर गेल्यावर तळ्यात आंघोळ करून
भिमशंकराचे दर्शन घ्यावे
आणि पावसाल्यात ,,,?
भिमशंकरा,,,,?या सारखी दूसरी पर्वणी नाही.
मुसळधार पाउस म्हणजे काय?
धुक्याची दुलाई ,,?
हलूवार गुदगुल्या वारा सुध्हा आपल्याला कसा करतो ?
डिम्भे धरण त्यातील पाणी ,
अरे बापरे,,,, मी तर कवी झालो?
बस हा अनुभव तुम्हीही घ्यावा हीच विनंती
ट्रेकर असाल नसाल तरी भीमाशंकर ची मजा काही औरच
हा अनुभव घेतला असेल तर ठीकच नसेल तर नक्की घ्याच.
No comments:
Post a Comment