||श्री शिवरायाय नमः||
अनादी मी अनंत मी अवध्य मी ,
मज मारील रिपु कवण जन्माला "
असे सांगणारे गड कोट म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच,,,दिनाक १.१.१० व्ही रेंजेर सोबत नलीची वाट ,,,
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी ४\५ वाटा आहेत .
साधले घट,पाचनाइ,खिरेश्वर,बेलपाडा ,कोतुल,आणि नलीची वाट ,,,,,,
ऊँची १४२४मीटर , म्हणजे ४६७१ फुट उंच .हा गड पहायचा म्हणजे कमीत कमी २ दिवस हवेत. दुरून डोंगर साजरे म्हणजे काय ते,,
पुणे, नगर आणि ठाणे
यांच्या सिमारेषेवर हा गड आहें हरिशचंद्र गड,,,,आणि त्याचा बेलाग

सह्यपर्वताच्या ज्या डोंगराळ भागात हरिशचंद्र वसलेला आहें.तो भाग डांग य नावाने ओळखला जातो .इथल्या
हरिश्चान्द्राला लागुन असलेला नकटा ,
पश्चिम बाजुस अंगावर येतील असे भीती दायक कड़े लाभले आहेत .
शुक्रवारी आम्ही निघालो कारण निसर्गवेडयानची पंढरी आम्हाला साद
घालत होती कोकण कडा त्याची अजस्त्र आंतरवक्र भिंत .
चालायला सुरवात केली आणि संध्याकाळी
आम्ही ५ वाजता गडावर पोहचलो तब्बल १० तास ,,,काय चेष्टा आहें राव?कुठेही पाण्याची सोय नाही मोठ मोठाले दगड आणि प्रचंड घसरा ,,
नलीची वाट,
झाड़ी नाही सावलीही नाही आणि आम्ही चालतोय,,,
समोर कोकण कडा दिसतोय वाटतय हे आत्ता पोहाचु वर पण कसल काय आम्ही चालतोय चालतोय आणि एकदाचे कड्यावर पोहचलो.नवख्या माणसाला सुरवातीला या कड्याच्या मध्यावारून खाली नजर फिरवण्याचे धैर्य होत नाही कड्यावरून आपटून वर येणार्या भन्नाट वार्यामुले हलकी वस्तु खाली टाकल्यास. लगेचच ती वर येते. जवळ जवळ अर्धा किलोमीटर परीघाचा अर्धवर्तुलाकृति आंतरवक्र असा हा कडा अवघ्या सह्याद्रित अजोड आहें
वर पोहचलो कड्यावरून नजर खाली पहायचा मोहा मी आवरु शकलो नाहीसमोर दिसणारी भीषण दरी बेलाग कड़े,सह्या पर्वत रांगा आणि अफाट पसरलेला कोकण कडा ,,
कड्यावर निजुनच आम्ही त्याच्या उंचीचा अंदाज घेतला आणि काय सांगू? माझ्या वारकर्याच्या भाषेत सांगायचे झाले तर,,
जो आनंद आम्हाला पंढरपुरात गेल्यावर होतो ,,
तोच आनंद मला कोकण कड्यावर पोहचल्यावर झाला
वर तारामती शिखाराच्या पोटाशी नऊ लेणी आहेत
पुरुष भर उंचीची गणेशाची मूर्ति देखिल आहें.
हरिशचंद्रा पासून खाली गेले की केदारेश्वरचे गुहेत पुरुष भर उंचीचे अप्रतिम शिव लिंग आहें .पिंडी भोवती कमरे इतक पाणी आहें . हे पाणी इतके थंड आहें की त्यात हात ही घालू शकत नाही पण,,
आम्ही आंघोळ केली आणि त्या थंड पाण्याचा मनमुराद आनंद लुटला.
अवघड वाटा,जंगल, कड़े कपारी, पायाखाली तुडवित असताना मनात मात्र असंख्य विचार येत होते आज आमच्याकडे असंख्य सोयी सुविधा आहेत तरीही हे रस्ते ओलांडतानाते किती खडतर आहेत
याचा पावलो पावली अनुभव येत होता .आजुबाजुला राहणारे आणि आमच्या सारखेच ,,
केवळ येवू शकतात.
इतरांसाठी,,?त्यानी विचारही करू नये.
मग सहजच प्रश्न पडला तो असा,
या महाराष्ट्रावर पर्कियानी कसे काय राज्य केले?
इथल्या जंगलात ते हरवले कसे नाहीत ?
इथले दगड धोंडे त्याना कधीच आडवे गेले नाहीत काय? कड़े कपार्यात पडून त्यांचा कपाळमोक्ष कसा नाही झाला ?
इथे गवताला ही भाले फुटतात मग ते परकीयांना कसे काय वश झाले?
लेखन्या मोड़ा आणि बंदुका हाती घ्या असे संगनारे इथे जन्मले तरी हा देश पारतंत्र्यात कसा गेला?
राकट देशा कणखर देशा दगडां च्याही देशा ,,,म्हननारे?
छात्रपतिंचे मावले सारे सारे हे कुठे गेले होते ?की परकियानी येथे
वारन्वार आक्रमने करून आमच्यावर राज्य केले.
आमच्या आया बहिणींना देशोधडीला लावले.आणि अखंड हिन्दुस्थान द्विखंड करून त्याला पुरते नागवुन इथून चालते झाले.
आणि आम्ही हे सार वाचवायच सोडून आम्ही आजही उदासीन आहोत.
या गड किल्ल्या विषयी पुरेशी माहिती नाही .जाणून घायची इच्छा नाही.
कोण हरिश्चंद्र माहित नाही तारामती कोण माहित नाही.
रोहिदास कोण माहित नाही .
हरिश्चंद्रचा त्याग माहित नाही ,चांगदेव कोण माहित नाही.निदान त्यांच्या विषयी आदर तरी?
सर्वच ट्रेकर्स आणि हायकर्स सांगत होते
नलीची वाट अशी ,,
नलीची वाट तशी,,,पण आनंदा आणि सुधीर आणि त्याचे सहकारी
मित्र यांच्या मुलेच ही बिकट वाट अवघड वाट सोप्पी झाली.
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/आणि यूटूब वरील व्हिडियो पाहू शकता
खलील लिंक वर क्लिक करा
http://www.youtube.com/watch?v=mRmfJ9748p8
http://www.youtube.com/watch?v=ZXz_Jp98LH8
http://www.youtube.com/watch?v=IfW2dy7J2K8
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?
No comments:
Post a Comment