Monday, March 19, 2012

गुढीपाडवा,ईतिहास,शालिवाहन आणि डेस्टिनी ,,,

||श्री शिवरायाय नमः ||
काल क्रिश सिनेमा बघत होतो त्यात एक व्हिलन येवून त्या
शाळेच्या फादरला ह्रितिक बाबत विचारणा करतो कारण त्याला माहित असत
कि ह्रीतीकची माहिती त्यालाच आहे आणि त्याला तो हवा असतो आणि फादर सांगतो तो कुठे गेला माहित नाही काय झाल माहित नाही त्यावेळी तो व्हिलन रागावतो आणि म्हणतो ,
तो कुठेही लपला असेल त्याला शोधून काढेन कारण त्याच्या कडे त्याच्या बापाने दिलेल्या सुपर पवार आहेत तो असा मारणार नाही,

"फादर किसीके मरणे से उसकी डेस्टिनी तो नाही बदलती ना?"
मी नेमका ईथेच थांबलो आणि विचार करू लागलो
डेस्टिनी जर बदलत नाही तर ,,,
संभाजी महाराजांना मारल्या नंतर या महाराष्ट्राची मराठी राज्याची
डेस्टिनी कशी बदलली ,,,?
-----
गुढीपाडव्याच्या हि काही पौराणिक कथा आठवल्या ज्यातून आपण खूप काही शिकू शकतो.
साधारणतः शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य बनवले आणि त्यात प्राण ओतून शत्रूवर विजय मिळवला ,,,
विचार केला तर समजेल अस होत का कुठे ?
कुणी तरी उठतो आणि मातीची खेळणी बनवतो आणि त्यात प्राण फुंकतो,आणि शत्रूवर विजयही मिळवतो,,,?
अस होत का ,,,?
साधा विचार केला तर लक्षात येईल कुणी तरी एक कुंभाराचा मुलगा
काही कामधंदा नसल्यासारखा खेळणी काय बनवतो आणि मंत्र काय मारतो ती खेळणी जिवंत काय होतात शत्रूवर विजय काय मिळवतात
सार सार अशक्य प्राय ,,,?पण मग खर काय?
कुंभाराच्या मुलाला ,,,? हो शक्य होत ते कारण,,,
थोड मागे जावून ईतिहासात डोकावलं तर सर् लक्षात येईल पण आम्हाला ईतिहासात डोकवायची सवय आहे ती एकमेकांच्या चुका शोधण्यासाठी त्या सुधारण्यासाठी आम्हाला ईतिहासात डोकवावंस वाटत नाही असो,,
-एका गवळ्याच्या मुलाला गोवर्धन कसा काय उचलता आला?
-हनुमंताला साता समुद्रापार कसे काय जाता आले ?
-तानाजी पडला तरी सिंहगड कसा काय घेता आला ?
-शिवाजी महाराज अफझल खानच्या हातून कसे काय बचावले ?
-विशाळगडी कसे काय पोहचले?
-बाजींनी ती घोडखिंड कशी काय थोपवून धरली?
या साऱ्या आणि अशाच प्रश्नाची उत्तर उत्तर शोधायचा आपण प्रयत्न केला तर आपल्या नक्कीच लक्षात येईल या सर्व कार्यात दरवेळी
कुणी ना कुणी तरी एक शालिवाहनाच्या रुपात उभा होता ,
आणि चैतन्यहीन ,पौरूषहीन,पराक्रमहीन समाजात आपल्या पराक्रमाने आपल्या अमोघ वाणीने ,मृतवत स्वाभिमान शून्य समाजात संजीवनी फुंकत होता ,,,
आणि त्यात त्या वेळी त्या समाजाने आपल्या पराक्रमाने ईतिहासात
आपल् नाव नोंदवून ठेवल,,
लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राच्या नशीबही असाच एक शालिवाहन जन्माला आला होता पण जिवंतपणी आम्हाला त्याची महत्ता कळली नाही.पण ज्यांना कळली,,

त्यांनी त्यांच्या मृत्यू नंतर त्या पापी दुराचारी हरामखोर
औरंग्याला याच मातील गाडला,,अटकेपार झेंडे लावले
दिल्लीच तख्त फोडायची ताकद निर्माण केली ,,
लाल किल्यावर भगवा फडकावला ,,
पानिपताच युध्द सर्वाथाने जिंकल ,,
ईतकी दहशत बसवली मराठ्यांनी कि पुन्हा त्या वाटेने कुणा परकीयाची हिंदुस्थांकडे कानाडोळा करायची पुन्हा हिम्मत झाली नाही,
हे सार घडल कारण त्या वेळच्या समाजाला आपली चूक समजली
आणि पुन्हा त्यांनी "शिवाजी-संभाजी" या मंत्राचा जागर केला. 

कारण १०० शेळ्यांच नेतृत्व एका वाघ कडे असेल तर शेळ्याहि
वाघा सारख्या लढतात आणि १०० वाघांच नेतृत्व जर एखाद्या
कुत्र्याकडे असेल तर वाघ हि आयत्या वेळी शेपूट घालतो,,,

आणि संभाजी महाराजांनी दाखवून दिल त्यांच्या अफाट कर्तुत्वाने ,,
"स्वधर्मे निधनं स्वया
परधर्मे भयावहः"
परधर्मात जाण्यापेक्षा मी मृत्यू स्वीकारेन,अस ठणकावून सांगितल
त्या पापी औरंग्याला ,,,
अरे जा ओरडून सांगा आणि जगातील तज्ञांना विचारा एका
दारुड्या व्यसनाधीन माणसात ईतकी ताकद असते हे सार सहन करायची,,,?

(त्यांच्या वरील अत्याचार सांगायला एक वेगळा ग्रंथ लिहावा लागेल)
अशा या शालीवाहानच दृष्ट्या शंभू महादेवाच महत्व
मग महाराष्ट्राने जाणल त्याचा आदर केला पण उशीर झाला होता
हा शंभू महादेव पुन्हा महाराष्ट्रात जन्माला नाही आला ,,
कारण महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना विसरला,
त्यांचा वापर फक्त त्यांचे पुतळे उभारण्यासाठी केला ,,
आणि त्यांच्या विचारांना त्यांच्याच पुतळ्या खाली मुठमाती दिली,,,
शिवाजी सोडून पुजती गांधीला विसरले सारे स्वापराक्रमाला,,,
आज गरज आहे पुन्हा एका शालीवाहानाची
शिवाजींच्या पराक्रमाची ,शंभू महादेवाच्या स्वाभिमानाची
आपल्या रोमारोमात शिवाजी-संभाजी भिनावण्याची

मग तो दिवस दूर नाही,,
जेव्हा पुन्हा या भारत वर्षावर हिंदुस्थानवर हिंदूंचा भगवा फडकेल,,

चला तर आज या महाराष्ट्र भवानीच्या चरणी साकड घालू "आई पुन्हा एकवार या महार्ष्ट्राच्या पोटी शंभू महादेव जन्मास घाल,ऐकेल ती महाराष्ट्र भवानी ऐकेल,अगदी त्याच आर्ततेने हाक मारा,ज्या आर्ततेने जीजावूनी आई भवानीस हाक मारली होती,"
तरच हिंदूंच्या विजयाची पताका ,

त्यांच्या त्यागाची ,पराक्रमाची,निस्पृहपणाची,स्वाभिमानाची
स्वधर्मे निधनं स्वया ,,,ची गुढी उभारली जाईल रोवली जाईल.

6 comments:

  1. अप्रतिम साहेब खूप खूप आभार

    ReplyDelete
    Replies
    1. [Offline] Chandrakant Khade ck18khade@gmail.com to me

      show details Mar 22

      sunil saheb ha mail mobile varun pathvla ahe kahi chuklyas maf kara
      aapan chhan mahiti dili tumcha etihasacha abhhyas far tagda ahe...
      chandrakant khade.

      Delete
  2. [Available] sunil bhumkar to Chandrakant

    show details Mar 23

    chandrakant aadhi tar mala saheb boln sod aani abhyas vaigere kahi nahi re
    hi samajik bandhiki aahe ti japayacha kasoshin praytn karto eetkach he ja aapan nahi kel tr udyachya pidhila kay uttr denar aapan?
    - Show quoted text -

    ReplyDelete
  3. [Offline] Shantanu B. Khedkar shantanukhedkar@gmail.com to me

    show details Mar 20

    Sundar Apratim........
    - Show quoted text -

    ReplyDelete
  4. [Offline] Chandrakant Khade ck18khade@gmail.com to me

    show details Mar 22

    mast sunil saheb

    स्वत्व आणि सत्व शून्य हिंदूंनो विचार
    करा आणि मगच गुढीपाडवा साजरा करा,,
    हर हर महादेव!हर हर महादेव!!हर हर माहेव!!!
    हिंदू म्हणुनी जगण्या तव वृत्ती देई |
    सिंहासम जगण्य तव तेज देई||
    शिवपुत्र !द्याल उरीचे जरी धैर्य मम |
    मारुनी म्लेंच्छ अवघे रणी रक्षू धर्म ||

    ReplyDelete