Tuesday, February 21, 2012

तुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तर ,,,

एक आवाहन
श्री.शिव छत्रपतिंनी जवळपास ३०० गडांवर राज्य केले
या पैकी बरेचसे गड त्यांनी स्वतः बांधवून घेतले
पण त्यांनी स्वतः एकही गडावर आपले नाव लहिले नाही .
अगर कोरले नाही ,,,
मनात आणले असते तर त्यांना ते अवघड नव्हते
राज्यकर्ता असल्याने त्यांना ते सहज शक्य होते
पण स्वकर्तुत्वाने त्यांनी स्वतःचे नाव ईतिहासात अजरामर केले
पण ,,,
आम्ही कपाळ करंटे
कुठे एखादा दगड पहिला कि लगेच
मी मिळेल त्याने आपले नाव त्यावर लिहून ठेवतो
माझ स्वतःच अस वैयक्तिक अस आवाहन आहे
कि कृपया त्या गडांच्या दगडांवर आपल नाव कोरून त्याला
विद्रूप करू नका तर स्वकर्तुत्वावर गडाचा निखळलेला
किमान एक तरी दगड लावायचा प्रयत्न करा
तुमच्या मनात जरा जरी महाराजां बद्दल आदर असेल तर
कृपया असला मूर्खपणा न करता त्या गडाची
जोपासना करा ,त्याच जतन करा ,
अधिका धिक लोकांना गड पाहायला उद्युक्त करा
त्यांना सांगा
गड- किल्ला का पाहायचा ?
त्यांना सांगा
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत .
त्यांना सांगा
अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
 
त्यांना सांगा
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे .
त्यांना सांगा
अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत.
त्यांना सांगा
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ,
आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील,
आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर...?

महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काही करू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..

त्यांना सांगा
जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।






1 comment:

  1. महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
    करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
    एक तरी गड किल्ला फिरून बघा
    एकटे शिवाजी महाराज जर ईतका काही करू शकतात तर आपणात प्रत्येकात
    एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..
    त्यांना सांगा
    जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

    ReplyDelete