Monday, February 6, 2012

तो दिवस होता शनिवार दि.६ फेब्रुवारी १२९४..........!!!

दि.६ फेब्रुवारी १२९४..........!!!
हवेत धूळीचा लोट उसळला आणि त्या लोटातून घोडेस्वारांच्या आकृत्या स्पष्ट दिसू लागल्या.बहुतेकांच्या चेहर्यावर उद्धट आणि उर्मट भावनानी एक प्रकारचा क्रूरपणा आला होता.त्या सर्व स्वारांच्या अग्रभागी असलेला पुरुष मध्यमवयीन आणि धिप्पाड होता.
"मलिक...??"--धावत्या घोड्यावरुन मागे वलून पहात त्याने विचारले.
"जी हुजुर...." त्याच्या घोड्याच्या सरळ रेषेत आपला घोड़ा आणत मलिक उत्तरला.
"रास्ता सही आहे??"
"होय हुजुर...."--मलिक.
"चाचाजानशी झगडा झाल्याने आम्ही तेलंगनच्या राजापशी निघालो आहोत अशी आम्ही हूल उठवली होती.ती सच मानून चाचाजान आमच्यावर फौज रवाना करतील असा दर आमच्या मनात येतो."
"ते का हुजुर..??"--मलिक.
"मलिक,तू जरी इस्लामचा स्वीकार केला असला तरी अफगाणी तुर्कांची पुरती ओळख तुला नाही."
मलिक गोंधळला.
"मलिक,चाचाजान बुड्ढे आहेत आणि बुढेपण माणसाला रहमदिल बनवते.रहम दिल सुलतान अल्लाच्या सूचनेचं नेमकं पालन करू शकत नाही."
"पण दिल्लीची प्रजा सुल्तानाना चाहते.."---मलिक.
"परन्तु काफिरांचे काय?" त्या पुरुषाने तीक्ष्ण स्वरात प्रश्न केला." काफिरांवर रहम करणारा सुलतान तख्तावर बसण्यास लायक नसतो.हिन्दुस्तानात अल्ला-तालाच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी अल्लाने आमची नियुक्ति केली आहे."
मलिक चमकला.त्याला दिल्लीच्या सुल्तानाच्या पुतन्याच्या मनात काय विचार घोळत आहेत याचा पुरेपुर अंदाज आला होता.मलिक पुरता विचारात पडला होता.मूळचा हिन्दुच असल्याने पूर्वायुश्यातील संस्कार त्याला पुरते सोडून गेले नव्हते.दिल्लीच्या मुसलमान सुल्तान...ांच्या क्रूरपनाच्या कथा त्याने ऐकल्या होत्या आणि प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या.
"क्यों मलिक,बोलत नाहीस??"---त्या पुरुषाने विचारले.
"काही नाही"--मलिक.
आता त्यांचे लक्ष होते दक्षिणेस असलेली देवगिरी.
घोडे उधळत होते.....आणि अचानक एक बाण एका घोड्यासमोर येवून आपटला.घोड़ा बिचकला.बाजुच्या झाडीतून एक घोडेस्वार बाहेर आला.
"कोण तुम्ही?कुठे निघालात? देवगिरीच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही."
तो पुरुष क्षणभर विचारात पडला.
"तुमचे स्वामी कोण आहेत?"--त्या पुरुषाने विचारले.
"यादववंशीय राजा रामदेवराय."
एका नव्या भयकारी प्रलयाची ती सुरुवात होती.कारण अल्पावधितच ती फौज देवगिरिच्या पंचक्रोशिपाशी आली....आणि त्या सेनेचा प्रमुख होता अल्ला-उद्दीन खिलजी...आणि ते दिवस होते फेब्रुवारी १२९४ चे....!!
५-२-०९
जेधे
‎"महाराज,देवगिरीवर आक्रमण झाले आहे."
"शत्रु कुठे आहे?"
"देवगिरीच्या पंचक्रोशित..."
बातमी भयावह होती.नगरात एकच आकांत उसळला होता.देवगिरीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या सैनिकांचा प्रतिकार मोडून काढून मुस्लिम सेना आत घुसली होती.धर्मवेडाने वेडावलेल्या म...ुस्लिम सैन्यासमोर हिन्दू सैनिकांचा निभाव लागत नव्हता.स्त्रियांची अबरू लुटली गेली.मुले-बाले,वृद्ध अगदी कोम्बडे कापल्यासारखे कापून काढले गेले.
"अल्ला-हु-अकबर......."---अल्ला-उद्दीन ओरडला.
"एकही काफिर जिवंत सोडू नका.सर्व काफिरांची कत्तल करा.जन्नत मध्ये तुम्हाला उच्च स्थान मिळेल.गाझी म्हणुन तुम्हाला सर्व जग ओलखेल."
...अणि त्याचा असा परिणाम झाला की गाझी म्हनवून घेण्यासाठी पठाण त्वेषाने लढले.हिन्दू मोठ्या संख्येने मारले जावू लागले.स्त्रियाना भर रस्त्यात नागवले गेले.वृद्ध बकरी कापल्याप्रमाणे कापले गेले
.......................आणि
.
.
.
.
..................तो दिवस होता शनिवार दि.६ फेब्रुवारी १२९४..........!!!

No comments:

Post a Comment