Friday, January 6, 2012

भारताच्या ईतिहासात,,,,

''छत्रपती शिवाजी महाराज''_ केवळ नाव ऐकूनच मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग  चेतवणारे असामान्य व्यक्तिमत्व.
शिवरायांचे चरित्र म्हणजे अखंड उर्जस्वल
प्रेरणेचा निरंतर स्रोतच आहे.
शिवाजी महाराज केवळ मराठी रयतेचे
दैवत नसून अखिल भारताच्या हिँदु
जनमानसाचे प्रमाणभूत पुरुषोत्तमच आहेत.
शिवरायांचे धगधगते जिवनचरीत्र म्हणजे
भारताच्या पिढ्यान पिढ्यांना अलौकीक
राज्यकर्त्याचे नित्य प्रेरणादायी आदर्श
वस्तुपाठच आहे.
अश्या ह्या लोकोत्तर महापुरुषाचे कार्य
आणि जिवनगाथा नविन
पिढीला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून
अधीकाधीक शिकवायला हवी.
मात्र मराठी माणूस
आणि मराठी माणसांचे दैवत छ.
शिवाजी महाराज ह्यांना नेहमीच
कमीपणाची व दुय्यम वागणूक केँद्र सरकार
देत आले आहे.
NCERT ह्या केँद्र सरकारच्या शिक्षण
संस्थामधे ७ वी व
८वी च्या मुलांना जो ईतिहास
शिकवण्यात येतो तो म्हणजे मुस्लीम
तुष्टीकरणाचे अत्यंत हीन पातळीचे
उदाहरण आहे.
भारताच्या ईतिहासात जात्यंध
आणि अत्याचारी मुघल
राज्यकर्त्याँची उदोउदो करणारी साठ
पाने आहेत तर देशाला ललामभूत असे
जाजव्ल्य हिँदु अस्मितेचे प्रतिक
अशा शिवाजी महाराजांवर फक्त आठ
ओळीच आहेत.
'फक्त आठ ओळी'.
मित्रांनो तुमच्या धमन्यांतून जर हिँदु
रक्त वाहत असेल तर तुम्हाला हे वाचून
संताप अनावर व्हायला हवा.
शिवाजी महाराजांचा असा अनुल्लेखाने
अपमान करणाऱ्या काँग्रेस सरकारला धुळ
चारल्याशिवाय एकही शिवप्रेमीने स्वस्थ
बसता कामा नये.
जय शिवराय!

No comments:

Post a Comment