Tuesday, December 13, 2011

श्री.शिवाजी,श्री.संभाजी महाराज म्हणजे "नफ्याचे साधन "

||श्री शिवरायाय  नमः||
मराठ्यांच्या मनात शिवाजी आणि संभाजी जागृत होते तो पर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण देशावर सत्ता होती.
जेव्हा मराठे शिवाजी आणि संभाजी महाराजांना विसरले ..आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली .
पानिपतची लढाई झाली . मराठे त्वेषाने लढले . पानिपतच्या पराजयानंतरहि मराठ्यांनी देशाच्या राजकारणावर पुन्हा पकड मिळवली .
त्या हरामखो...र अहमद शाह अब्दाली ला सामोरे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठेच गेले.
उत्तर भारतातील शीख , गुरखा , जाठ्ह , राजपूत , बुंदेले इत्यादी समाजातील आपापल्या बिळात उन्दरासारखे लपून बसले होते ..
आणि हेच लोक आजकाल मराठ्यांना देशभक्तीचे उपदेश देतात.
अरे जा ... भारताचा इतिहास चाळून बघा .. मराठे हे आधीपासून देशाचाच विचार करत आले.
नंतर आपला ... मराठ्यांच्या या शौर्याला , या त्यांच्या गुणाला इंग्रजांनीच वापरायचे ठरवले ...
अनेक आमिषे दाखवून मराठ्यांचीच भरती आपल्या सैन्यात केली ..
इसवी सन १७६८ मध्ये " मराठा लाईट इंफंत्री " ची स्थापना महाराष्ट्रात झाली .
वास्तविक पाहता इसवी सन १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांचे राज्य कलकत्यात स्थापन झाले .
पण त्यांनी सैन्य भरती केली ती महाराष्ट्रात. हे कसे झाले ??? महाराष्ट्राच्या हातून हे देशद्रोहाचे पातक कसे काय घडले ?
एकीकडे मराठे अटकेपार झेंडे लावत... पूर्ण देशावर मराठ्यांचा वचक होता
आणि दुसरी कडे मराठे शत्रूचे राज्य वाढावे म्हणून आपल्या शौर्याचा वापर करत होते.. का असे झाले ??
समई तील तेल जसे हळू हळू संपत जाऊन दिवा विझतो
तसेच मराठ्यांच्या मनातील शिवाजी आणि संभाजी यांच्या विचारांची ज्योत विझत चालली होती .
मराठे महाराजांना विसरत जाऊन पोटार्थी बनत चालले होते ...
एकेकाळी देव , देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारे मराठे संवेदनहीन बनले होते ..
खरेतर मनुष्य आणि प्राणी यांच्यात काही फरक जर असेल तर तो धर्मामुळेच असतो .
जेव्हा माणूस पोटार्थी बनतो. तेव्हा तो दोन पायांचा शेपूट नसलेला पशु बनतो .
कारण "भूक , भय , निद्रा आणि मैथून " या पशूंच्या गुणांप्रमाणे माणूस हि तसेच वागायला लागला तर माणसात आणि पशुत काहीही फरक उरत नाही ..
महाराष्ट्रात जर हि अशी स्थिती होती ..तर त्यावेळी इतर राज्यांचे तर विचारायलाच नको . भारतातील इंग्रजांनी राणीकडे फक्त सैन्य भरतीवर हवा तेवढा पैसा खर्च करण्याची परवानगी मागितली ...
इथे पैशांनी माणसे हि विकत घेउ शकतो, देशप्रेमाला इथे काहीही स्थान नाही ,
असे बरोबर राणीला समजावले. अशाप्रकारे इंग्रजांनी मराठ्यांना भरती करून हिंदुस्थानातील एकेक राज्य घेण्यास सुरुवात केली .
आणि हळू हळू १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्या नंतर संपूर्ण संपूर्ण हिंदूस्थानावर इंग्रजांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले...
हे सारे होत असताना महाराष्ट्रात राम विरुद्ध लक्ष्मण , भीम विरुद्ध अर्जुन अशीच स्थिती होती...
आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली .
त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय,

एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ?
आमची ती योग्यता कधीच नव्हती ...कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा ..
कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले ...
शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते .
हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते...
पूर्वी लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक वर्षीच्या दैनंदिनी लिहून त्या सबमिट कराव्या लागत त्या लौर्ड एलफिस्टन च्या डायरी वर दैनिक भास्कर मध्ये एक लेख आला होता..
त्यातील हा आमचा देशद्रोहाचा वृत्तांत ...
खरोखर आम्ही महाराजांना "नफ्याचे साधन " म्हणून वापरून घेतले ..कधी सत्तेसाठी , तर कधी मोठेपणासाठी .....
जय हिंद जय महाराष्ट्र 

1 comment:

  1. Hich ajachya hindustanachi shokantika ahe...

    Sachin Deshpande
    12:48pm Dec 13
    Hich ajachya hindustanachi shokantika ahe .....aaj aplya hindustanatil tarun pidhi spider man ani bat man tv var baghanyat vel ghalavatat......

    ReplyDelete