|| जय जय राम कृष्ण हरी ||
परवा पुण्यात गेलो होतो वारीत सामील होण्यासाठी तेव्हाची गोष्टसगळ पुण माऊलीमय झाल होत ,,,,
सगळीकडे जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ,
जय जय राम कृष्ण हरी ,ज्ञानोबा तुकाराम मावुली ,
असा घोष चालू होता माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी
पुण्यात डेरेदाखल झाल्या होत्या
नुसता भक्तीचामळाच जणू फुलाला होता
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशीच सगळ्यांची अवस्था झाली होती
पुण्यात गणपतीचा उत्सव आणि हा वारीचा सोहळा पाहण्यालायक असतात .
सार्या पुण्यात दिवाळी साजरी होतेय कि काय अस वाटत असत,
याच भक्तिमय वातावरणात मला स्वतःला विठ्ठलाने जाग केल
मला म्हणाला बघ मी आहे कि नाही याची प्रचीती हि घे ,,,,,,
तिथेच वारकरी फोनवर आपल्या घरी आईला फोन करून सांगत होता,,,
"आई आम्ही आता पुण्यात मुक्कामी आलोय ,
येथे खूप आभाळ आलाय पाऊस हि जोरदार पडेल असा वाटतंय
काळजी करू नकोस तिकडे सुद्धा असाच जोरदार पाऊस नक्कीच पडेल
आग त्या पांडुरंगाला आपली नाही तर कुणाची काळजी असणार आहे ?
वारी हा विश्वास देते ,,,,,,,,
सुखी संसाराची सोडोनिया गाठ वारीत सहभागी होणारा वारकरी
जे होईल ते पाहिलं जाईल जे होईल झेलल जाईल.
अस म्हणत त्याची काळजी न करता पंढरीच्या वाटेवर निघतो ,
हि त्यांची श्रद्धा त्यांचा विश्वास पुढील खडतर आयुष्य जगण्यासाठी,
प्रेरणा देत राहतो ,,,,,,मग,,,
तुम्ही कधी जातंय वारी अनुभवायला ,,,?
एक तरी वारी अनुभवावी.
आग त्या पांडुरंगाला आपली नाही तर कुणाची काळजी असणार आहे ?
ReplyDeleteवारी हा विश्वास देते ,,,,,,,,
सुखी संसाराची सोडोनिया गाठ वारीत सहभागी होणारा वारकरी
ReplyDeleteजे होईल ते पाहिलं जाईल जे होईल झेलल जाईल.
अस म्हणत त्याची काळजी न करता पंढरीच्या वाटेवर निघतो ,
हि त्यांची श्रद्धा त्यांचा विश्वास पुढील खडतर आयुष्य जगण्यासाठी,
प्रेरणा देत राहतो