Sunday, July 3, 2011

दिंडी वीणा जीवन,,,,,,२

|| जय जय राम कृष्ण हरी ||
अर्थात मनुष्य वीणा
दिंडी मग ती तुकाराम महाराजांची असो वा ज्ञानेश्वर मावुलींची
वीणा घेतल्या शिवाय ती पायी वारिस पुढे निघत नहीं .
तसा नियमच आहे विणेकरी नसेल तर चालेल पण वीणा हवा ,
विणेकर्याने तशी सोय करावी अर्थात ही पळवाट आहे पण काहीही असो वारीत वीणा हवा,,,
वीणा हा वारी परंपरेचा मापदंड समजला जातो,,,,
अस म्हणतात अनुभव अनिवार्य झाला की वीणा लागतो .

तारा छेडल्या की मग मन गायला लगते.
वारीचे अंतर सहज कापता येते .
आपण किती चाललो याचे भान राहत नाही .
शेतातील मोर हि निसर्गाची वीणा,,,
मनाला योग्य वेळी सूर सापडण हि विठ्ठलाची वीणा आहे .
वीणेच्या खुंट्या पिळल्याशिवाय वीणा सुरावर लागत नाही ,,,,,,,,,
आपल्या आयुष्याच गणितही तसाच नाही का?

योग्य वयात आई वडिलांनी आपल्या मुलांचा कान  पिळला  नाही तर  ,,,,,,?
ह्या जगाकडे डोळे उघडे करून पाहायला नाही शिकवलं तर,,?
आयुष्याच्या खडतर मार्गावरून चालताना सूर नाही लागला तर,,?
हि मनुष्य वीणा योग्य वेळी झंकारली नाही तर ?
आणि ह्या वीणेचे तार छेडणारे हात चुकीचे असतील तर,,?
तर हा वीणा काय करेल ,,,,,,,,,,,?
एक छान गोष्ट येथे सांगावीशी वाटते,,,
एक चोर होता वयोवृध्द झाल्यावर आपल्या मुलाला तो चरी कुठे कशी करायची ते सांगतो,
तो सांगतो बघ मी त्या झोपडीत साधू राहतो ना ,
आज पर्यंत मी फक्त त्याच्याच घरी चोरी करत आलो आहे
त्यामुळे आज पर्यंत मी पकडलो गेलो नाही .
मुलगा म्हणतो साधू कडे चोरी त्याच्या कडे काय असणार?
चोर म्हणतो बाळा अरे त्याला मोठ मोठे धनिक सावकार
लाखोने द्रव्य देतात त्याला त्याच गरज नाही म्हणून मी
चोरी केलेली त्याला समजत नाही आणि आणि
समजत असली तरी तो काही तक्रार करत नाही
त्याला काय कमी आहे?
मुलगा म्हणतो मग मी साधुच बनतो ना,,,,,,,

तिथेच जाऊन राहतो कसा.
आज गेली कित्येक वर्षे चोरी करूनही त्या साधूला  काहीही कमी पडल नाही
तुम्ही मात्र जीव धोक्यात घालून चोरीच करत आहात
तुमच ना पोट भरल ना मन ,,,

असा हा मनाचा वीणा सुराला लागला कि
साक्षात पांडुरंग उभारतो भक्ताच्या भेटीला धावून येतो 
आणि म्हणूनच
अस म्हणतात आयुष्याला योग्य वेळी
दिशा नहीं मिळाली  की दशा व्ह्यायाला वेळ लगत नहीं
म्हनुनच हे वीणा गायन ,,,
अर्थात एकदा तरी वारीही अनुभवलीच पाहिजे त्यासाठी .

5 comments:

  1. Dear,
    Tuzya mail Kuup changalya asatat.
    Thanks,

    Regards,
    Mahendra Satam

    ReplyDelete
  2. भाउसाहेब, एक मेल पाठवली आहे, बघून घ्यावी.. मग पाहिजे तर लाथा घाला पण उत्तर जरूर देणे..

    ReplyDelete
  3. भाउसाहेब, एक मेल पाठवली आहे, बघून घ्यावी.. मग पाहिजे तर लाथा घाला पण उत्तर जरूर देणे..

    ReplyDelete
  4. || जय जय राम कृष्ण हरी ||

    ReplyDelete
  5. असा हा मनाचा वीणा सुराला लागला कि
    साक्षात पांडुरंग उभारतो भक्ताच्या भेटीला धावून येतो
    आणि म्हणूनच
    म्हनुनच हे वीणा गायन ,,,
    अर्थात एकदा तरी वारीही अनुभवलीच पाहिजे

    ReplyDelete