Tuesday, March 1, 2011

नर्मदेsssssss हर

नर्मदेsssssss हर ,,,कभी न जाये घर 
आपुला संवाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
अशीच अवस्था येथे नर्मदा परीक्र्मेस येणाऱ्या प्रत्येक भाविकाची असते .
येथे या आणि नर्मदा मैयाच्या स्वाधीन व्हा तुम्हास काहीच चिंता करायची गरज नाही .
हे येथे येणारा प्रत्येक परिक्रमा वासी सांगतो
बस्स अनुभव घ्या सांगो वांगीवर विश्वास ठेवू नका ..
देव कुठे असेल तो येथे भेटेल नर्मदा मैया तुमची काळजी घेण्यास समर्थ आहे .
अशा या परम पवित्र ठिकाणी नार्नदा स्नानास जायचे भाग्य मिळाले
जबलपूर-मांडला येथे हा सामाजिक कुंभ मेळा भरला होता .
१०\११\१२ feb  २०११ रोजी
स्टेशन वर उतरल्या बरोबर आधी जेवा झोपा मग आरामशीर जा असा
आग्रह झाला मी बस मध्ये बसलो नियोजित ठिकाणी जायला २ तास लागले .
तो पर्यंत अंधार पडला होता काय करू या विचार चालू असताना
मराठी शब्द कानावर आले  
मुंबई ठाण्याचे ७\८ लोक बोलत होते मग मी हि त्यांच्यातला एक झालो .
सार्या लोकांनी म्हणजे पाटकर काका, मेस्त्री काका,लक्ष्मण राणे आणि मी
यांनी ठरवलं आधी पोटोबा करायचा मग शांत झोपू मग सक्काळी सक्काळी नर्मदा स्नानास जावू अस ठरवलं
आणि सकाळी गेलो स्नान केल संध्याकाळी परत आलो.
मला मुक्काम करायचा
होता बाकी सारे मुंबईस परत आले .
मी मग बसल्या बसल्या नर्मदा मैयाची माहिती मिळवली,,
ती अशी,
आदी- सत्य युगात भगवान शंकराने विंध्य पर्वतावर कठोर
तपस्या केली त्यावेळी त्यांना जो घाम आला तो ईतका मोठ्या प्रमाणात
पर्वतावर वाहू लागला त्यातूनच नर्मदेचा उगम झाला.
हि कथा येथेच संपत नाही,
त्या स्वेद प्रवाहाचे(घामाचे) अचानक एका कन्येत रुपांतर होते .
ती शिवाची आराधना करते,तीच नर्मदा ती एक विक्षण वर मागते
"देवा मला अक्षया अमर कर हि चराचर पृथ्वी प्रलयात नष्ट झाली तरी
माझ अस्तिव्त टिकून राहू दे ,
माझ्या पाण्यात स्नान करताच पापीही पाप मुक्त होवू दे,,,
१९७८ मध्ये देव कछार तेथे हत्तीचा सर्वात मोठा सांगाडा मिळाला .
याचाच अर्थ हि नर्मदा घाटी आदिम जीवांची आधार भूमी होती
हे सिद्ध होत.
या खेरीज समुद्री घोडा, डायनोसोर, वगेरे प्राण्यांचे जीवाश्म
नदीकिनारी सापडले आहेत.
२ वर्षा पूर्वी मांडवगड येथे डायनोसोर ची अंडी मिळाली आहेत .
यावरून नर्मदा किती प्राचीन नदी आहे हे समजत .
वशिष्ठ संहितेत मात्र जरा वेगळी परंतु
शंकराशी निगडीतच कथा आहे ,
अंधकाराचा वध केल्या मुळे प्रसन्न चित्त होवून भगवान शंकर बसले असताना ,विष्णूनी शंकराची स्तुती करत त्यांना म्हंटल
ब्रम्हा विष्णू महेश ईन्द्र चंद्र आदी देव दानवांच्या हिंसाजन्य पापा मुळे आम्ही दुषित झालो आहोत,
या पाप शमणासाठी काय करायला हव?
हा संवाद चालू होता अमर कंटक पर्वतावर
भगवान शंकराच्या हृदयात
करुणा उत्त्पन झाली त्याचक्षणी
त्यांच्या चंद्र कलेतून एक बिंदू पृथ्वीवर पडला .
तिची हि नर्मदा मैया ,,
नर्मदेच्या अनेक नावांपैकी प्रचलित नाव रेवा ,,
स्कंद पुराणात नार्मादेवरचा जो विभाग आहे त्याला
रेवा खंडच म्हंटल आहे रेवते ईती रेवा,,,    
उड्या मारत मारत प्लवगतीने धावणारी
पर्वत पाषानालाही फोडून काढणारी जिचा रव(आवाज)
सर्व दिशात पसरतो ती रेवा,,,,,
शोन, नद आणि नर्मदा ,,,,,,,,,,
नर्मदा हि मैकाल राजाची मुलगी शिन वर लुब्ध झालेली,,,,
अचानक मैकाल राजाचा मृत्यू होतो म्हणून
त्यांचा विवाह लांबणीवर पडतो,
विवाहाला विलंब
होणार आहे असा निरोप नर्मदा आपल्या
दासीकडे जोहीला तीच नाव,,,देते आणि शोन कडे पाठवते .
परंतु जोहीला
शोनवर लुब्ध होते त्याला सांगते मीच नर्मदा
आणि लग्न करते ईकडे नर्मदेला हि गोष्ट समजते ,,,
तो अपमान ते कपट सहन न होवून नर्मदा
अमरकंटकच्या कुंडात उडी घेते  जलरूप घेवून प्रवाहित होते.
शोनला खरे समजते तसा तोही त्या कुंडात उडी घेतो
हि आणि अशा अनेक दंतकथा या नदीशी निगडीत आहेत
असो पण मजा आहे ती
परिक्रमा करण्यात देवताच अनुभव घेण्यात
माणसाला समजून घेण्यात निसर्गाशी एकरूप होण्यात .
आणि ठायी ठायी देवत्वचा अनुभव घेण्यात
नर्मदा नदी परिसर अनुभवाची
खाण आहे या एकदा अनुभव घ्या .
सरदार सरोवरात हा सारा ईतिहास लोटण्या आधी जमेल तसा
जमेल तितका ह्या प्राचीन परिसराचा अभ्यास करा
बघा नर्मदा मैयाचा प्रसाद तुम्हाला नक्कीच मिळेल
नर्मदेsssssssss हर.

येथे आपणास पिकासा लिंक वरील नर्मदा सामाजिक कुंभ स्नानाचे फोटो पहावयास मिळतील  ,,,
नर्मदा लिंक वर क्लिक करा,,,,,,


No comments:

Post a Comment