Saturday, January 8, 2011

पुतळा

सध्या महाराष्ट्रात आणि या आधी हि पुतळ्यांच राजकारण बरच गाजत आल आहे
त्या निमित्ताने पुतळ्यांच्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी,,,,,,,
सिकंदरच्या बागेत आणि जागोजागी विद्यमान पराक्रमी लोकांचे
पुतळे उभारलेले होते.
काही परदेशी पाहुणे ते पुतळे पाहायला आले
तेव्हा सिकंदरने त्यांना बागेत फेरफटका मारायला नेल.
पुतळा दिसला कि साहजिकच ती लोक विचारात हा पुतळा कुणाचा?
सिकंदर उत्तर देई हा माझ्या आधीच्या सेनापतीचा पुतळा,,,,,
जवळ जवळ सार्या पुतळ्यान पाशी सिकंदर हेच उत्तर देई .
हे सारे पुतळे हिंडून फिरून झाल्यावर दमून एके ठिकाणी
त्या पर्यटकांनी बसकण मारली आणि विचारलं,
महाराज यात आपला पुतळा कुठे दिसत नाही ?
तेव्हा सिकंदर म्हणाला ,

हा पुतळा कुणाचा हे विचारण्य पेक्षा लोकांनी हे विचारले पाहिजे
कि येथे सिकंदरचा पुतळा कांही?
आज हे सार आठवायचं कारण फेसबुक वर एका मित्राने लिहले
कि दादोजी कोंडदेवां बद्दल शाळेतील मुल विचारात ,,,,,,,,,?
  Mandar Sathe

Mandar Sathe2:49am Jan 7
अनेक शाळांच्या सहली
काल एका पुण्याच्या मित्रा जवळ फोनवर बोलताना अस कळल की तिथे कोंडदेवांचा पुतळा हलवण्याच एक कारण सांगितल जातय,
तिथे लाल महालात जात आणी मुल म्हणत की हे महाराज,
ही त्यांची
आई आणी हे बाबा.
कारण कोंडदेव, शिवाजी आणी जिजाऊंचे पुतळे शेजारी शेजारी होते.
म्हणुन. . . . . .

जर यात तथ्य असेल तर भले चेष्टेच्या रूपात का असेना पण समाजाची मानसिकता आणी विचारसरणी कुठल्या दिशेने जात्ये अस समजायच. . .
हा पुतळा दादोजींचा हा शिवाजींचा आणि हा जिजाऊंचा हे सांगाव लागतय हे अपयश नक्की कुणाच ?
तुमचं, आमच, सरकारच कि या शिक्षण पद्धतीच ? 


No comments:

Post a Comment