डेरमाळ-पिसोळ
मुंबई, नाशिक, ताहराबाद, जायखेडा आणि पिसोळ वाडी
किंवा आधी जायखेडा, टिंगरी, डेरमाळ
श्री. भूषण पाठक याच्या समवेत आम्ही निघालो १९.२.१० थोड्या वेगळ्या
ठिकाणी शक्यतो जिथे कुणी गेल नाही महाराष्ट्रातील सर्वच ट्रेक्रसना अपरिचित नसला तरी
तरी थोडा आड़वाटेवरचा गड किल्ला आम्ही पहायचा ठरवल .
आम्ही सक्काली सक्काली डेरमाळला पोहोचलो आणि टिंगरी या गावातून चालायला सुरवात केलि
गावातून एक वाटाड्या घेतला
सर्व गाववाले आमच्या कड़े कुतूहल मिश्रित नजरेने पाहत होते
आणि आपापसात अहिराणी भाषेत बोलत होते कानाला ती खुप गोड लगत होती
आणि मानस ती तर त्याहून गोड़ ,,,,
नंतर सांगतो तर,,आम्ही निघालो डेरमाळवर २\३ तसत आरामत वर पोहोचलो
तर आम्ही वर पोहोचलो आणि गडाला डेरमाळ हे नाव का पडल ते लक्षात येत डेरे दार वृक्षानी ज्याचा माळ बहरलेला आहे असा तो डेरमाळ
गडावर मारुती गणपति शिवपिंडी आहेत
एक एक मोडकी भिंत इथे किल्ला होता याची साक्ष देत असते
पाण्याची टाके तुमची तहान भगवतात थोड़ी विश्रांति घ्यायची आणि परतीच्या मार्गाला लागायचे
पण त्या आधी पायथ्याशी आमच इंद्र बारिने स्वागत केल
(दोन डोंगर संगम)
त्या दोन डोंगरांना म्हणे दोरी बांधून हिडिम्बा राक्षसी झोका घेत असे (सोल्लिड ना?)
(भिमाची बायको आणि घटोत्कचाची आई )
मला माहित आहे हा विचार आजच्या जमान्यात पटनारा नाही
पण खरी मजा यातच आहे
अहो स्वप्न नागरित जायच म्हणजे हे आलाच तीच मंदिर ही आहे पायथ्याशी
गावकर्याँच्या म्हंणन्या नुसार तिथे पांडवांचा वास होता आजही तिथली जमींन
सरकार दरबारी पांडवांच्या नावे आहे आसो,,,
गावात मुक्काम करायचा आणि दुसर्या दिवशी पिसोळ गाठायचा .....
ऐका लेखकाने त्याच वर्णन करताना त्याला स्वप्न नगरी तील किल्ला
अशी उपमा दिली आहे हे का ते तिथे गेल्यावर कळल .
मी मात्र विचार करत होतो लेखकाला हा स्वप्न नगरी का वाटला ?
आणि सभोवताली मी नजर उचलून पाहु लागलो
लक्षात आल अरे हा तर कचरा मुक्त आहे
प्लास्टिक नावाचा ब्रम्ह राक्षस कुठेच दिसत नव्हता
म्हणून तर नाही स्वप्न नगरी ,,,?
एव्ह्डा कचरा मुक्त गड किल्ला निदान मला तरी कुठे आढळला नाही
हो पण आधी
पिसोळ वाडीचे सरपंच श्री सोनवाने याना भेटा
क्यालक्युलेटेड आयुष्य जगनार्या आपणाला स्वतः ची लाज
वाटल्या शिवाय राहत नाही पिसोळ सोडून मुम्बैला आलो तरी
अहिराणी भाषेत बोलणारे आणि मराठी समजणारे
सरपंच श्री.सोनवाने डोक्यातून जात नाही आणि हो
त्यांचे दात किती स्वच्छ आहेत हे प्रत्यक्ष पहिल्या
शिवाय नाही कळणार जेव्हडे दात स्वच्छ तितकच मनही स्वच्छ आहे या माणसाच.
इतका चांगला पाहूनचार करतात की शंका यावी आपण आपण आपल्याच घरात तर नाही ना?
तर असे आम्ही भारावलेले निघालो गडावर पायथ्याशी मारुती आपल्या स्वागतास हजर असतो.डेरमाळ प्रमाणेच इथे ही मूर्त्या आणि पाण्याची टाके आहेत
थोड़ी चढन घसरण आणि लिमबाची जाळी पार करत आपल स्वागत
किल्ल्याचा मोड़का दरवाजा करतो वर चढून गेल्यावर ४\५ वटवाघलांच्या गुहा दिसतात
आणखी थोड़े चढल्यावर चवदार पानी प्यायला मिळते
बाहेर नंदी आहे त्या टाक्यात श्री शंकराची पिंडी आहे
तिथे मी निवडूनगाचा चिक पाण्यात टाकल्यास कचरा कसा पळतो ते दाखवल्यावर
सार्यांचा एक तो खेळच झाला आणखी थोड वर गेल्यावर किल्ल्याचे पडके अवशेष दिसतात
आणखी एक लांब वरून दिसणारी ती डोंगराला पडलेली खाच प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घ्याच.
गावकर्यांच्या मते इथे राजे शिव छत्रपति कारभार पाहत असत पण ,,
इतिहासकार हे मानावयास तयार नाहीत त्यांच्यात दुमत आहे
आणि म्हनुनच आज महाराष्ट्रात ३\३ जयंत्या साजर्य़ा
होताहेत महाराजांच्या
ही अभिमानास्पद गोष्ट आहे की लाजिरवानी हे ज्याचे त्याने ठरवावे.
यू ट्यूब वरील व्हिडियो देखिल पाहु शकता dermal pisol Feb 19, 2010 by sunilbhumkar12 |
Message from sunilbhumkar12:
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/ lh/sredir?uname=suprabhu12& target=ALBUM&id= 5441071202877665585&authkey= Gv1sRgCJuDl4fd2ZP-8gE&feat= email
http://picasaweb.google.com/
No comments:
Post a Comment